महाराष्ट्रात ओमिक्रॉनने टेन्शन चांगलंच वाढवलं आहे. ओमिक्रॉन रूग्णांच्या संख्येत रोज भर पडते आहे. महाराष्ट्रात दिवसभरात ओमिक्रॉनचे 75 रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील ओमिक्रॉन रूग्णांची संख्या 653 झाली आहे.
महाराष्ट्रात दिवसभरात 75 ओमिक्रॉन रूग्णांची नोंद झाली आहे. हे सगळे अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिले आहेत. मुंबईत 40, ठाणे मनपात 9, पुणे मनपात 8, पनवेल 5, नागपूर आणि कोल्हापूरमध्ये प्रत्येकी 3, पिंपरी चिंचवडमध्ये 2, भिवंडी, उल्हासनगर, सातारा, अमरावती, नवी मुंबईमध्ये प्रत्येकी 1 रूग्ण आढळला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात आढळलेल्या ओमिक्रॉन रूग्णांची संख्या 653 झाली आहे. यापैकी 259 रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
Omicron: देशातल्या 23 राज्यांमध्ये पसरला ओमिक्रॉन, सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात
महाराष्ट्रातले 653 रूग्ण कुठे कुठे आहेत?
मुंबई- 408
पुणे मनपा-71
पिंपरी-38
पुणे ग्रामीण-26
ठाणे मनपा-22
पनवेल-16
नागपूर-13
नवी मुंबई-10
सातारा-8
कल्याण डोंबिवली-7
उस्मानाबाद आणि कोल्हापूर-प्रत्येकी 5
वसई-4
नांदेड, भिवंडी-प्रत्येकी-3
औरंगाबाद, बुलढाणा, मीरा भाईंदर आणि सांगली-प्रत्येकी 2
लातूर, अहमदनगर, अकोला, रायगड, उल्हासनगर आणि अमरावती-प्रत्येकी 1
एकूण संख्या-653
अजित पवार कानीकपाळी ओरडून सांगत होते मास्क लावा, ज्यांनी लावला नाही त्या सगळ्यांना झाला कोरोना
यातील 26 रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी 1 रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. 7 रुग्ण ठाणे आणि 4 रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर 9 रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.
महाराष्ट्रात 18 हजार 466 नव्या रूग्णांची नोंद
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. दिवसभरात 18 हजार 466 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 20 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर 2.1 टक्के झाला आहे. आज दिवसभरात राज्यात 4 हजार 558 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत एकूण 65 लाख 18 हजार 916 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रातले रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 96.86 टक्के झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 95 लाख 9 हजार 260 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 67 लाख 30 हजार 494 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 98 हजार 391 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 1 हजार 110 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.