नागपुरात होम क्वारंटाईनचा नियम मोडाल तर थेट गुन्हा दाखल होणार! - Mumbai Tak - a case will be registered against those violating home quarantine rules in nagpur - MumbaiTAK
बातम्या

नागपुरात होम क्वारंटाईनचा नियम मोडाल तर थेट गुन्हा दाखल होणार!

नागपूर: नागपूरमध्ये सातत्याने कोरोना रुग्णांची वाढ दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता नागपूर महानगरपालिकेने एक कठोर निर्णय घेतला आहे. होम क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या ज्या व्यक्ती नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल होणार आहे. तसंच 5000 रुपयांपर्यंत दंड देखील ठोठावला जाणार आहे. गेल्या 24 तासात नागपूरमध्ये तब्बल 1292 रुग्ण आढळून आले आहेत. नागपुरात कोव्हिड-१९ चा […]

नागपूर: नागपूरमध्ये सातत्याने कोरोना रुग्णांची वाढ दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता नागपूर महानगरपालिकेने एक कठोर निर्णय घेतला आहे. होम क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या ज्या व्यक्ती नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल होणार आहे. तसंच 5000 रुपयांपर्यंत दंड देखील ठोठावला जाणार आहे.

गेल्या 24 तासात नागपूरमध्ये तब्बल 1292 रुग्ण आढळून आले आहेत. नागपुरात कोव्हिड-१९ चा संसर्ग वाढत चालला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने लक्षणे नसलेल्या कोरोना बाधितांना त्यांच्या होम क्वारंटाईनची परवानगी दिलेली आहे. होम क्वारंटाईनमध्ये असले तरी त्यांना कोव्हिड नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र वैद्यकीय आरोग्य विभागाला तक्रारी प्राप्त होत आहे की, होम क्वारंटाईनमध्ये असलेले काही कोरोना बाधित निकषाचे पालन करीत नसून वैद्यकीय निकडीशिवाय इतरत्र बाहेर फिरत आहे. त्या अनुषंगाने सदर बाब ही गंभीर स्वरुपाची आहे. यामधून संसर्ग वाढण्याचा देखील धोका आहे. होम क्वारंटाईन असलेल्या नागरिकांच्या हातावर शिक्का मारण्याचे आदेश सुध्दा प्रशासनाकडून देण्यात करण्यात आले. आहेत.

चिंताजनक, राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 9927 जणांना Corona ची लागण

गेल्या 24 तासात नागपूरमध्ये तब्बल 1292 रुग्ण आढळून आले आहेत. नागपुरात कोव्हिड-१९ चा संसर्ग वाढत चालला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने लक्षणे नसलेल्या कोरोना बाधितांना त्यांच्या होम क्वारंटाईनची परवानगी दिलेली आहे. होम क्वारंटाईनमध्ये असले तरी त्यांना कोव्हिड नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र वैद्यकीय आरोग्य विभागाला तक्रारी प्राप्त होत आहे की, होम क्वारंटाईनमध्ये असलेले काही कोरोना बाधित निकषाचे पालन करीत नसून वैद्यकीय निकडीशिवाय इतरत्र बाहेर फिरत आहे. त्या अनुषंगाने सदर बाब ही गंभीर स्वरुपाची आहे. यामधून संसर्ग वाढण्याचा देखील धोका आहे. होम क्वारंटाईन असलेल्या नागरिकांच्या हातावर शिक्का मारण्याचे आदेश सुध्दा प्रशासनाकडून देण्यात करण्यात आले. आहेत.

नागपूर महापालिकेतर्फे सर्व होम क्वारंटाईन असलेल्या कोरोना बाधितांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची विनंती केली जात आहे. होम क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या व्यक्ती नियमांचे पालन करतात की नाही याची पडताळणी करण्यासाठी महानगरपालिका झोन स्तरावर भरारी पथक (फ्लाईंग स्कॉड) तयार करण्यात आलेले आहे.

ठाण्यात हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन नाही, पालिका अधिकाऱ्यांची कोलांट उडी

या पथकांना संबंधित रुग्ण जर नियमांचे उल्लंघन करताना लक्षात आले किंवा आढळले तर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल आणि १० दिवसाचे अनिवार्य क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. तसेच 5000 रुपयांपर्यंत दंड देखील आकारण्यात येणार आहे. असा इशारा नागपूर महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेला आहे. यासाठी पोलिस यंत्रणेसोबतही समन्वय ठेवून मनपामार्फत आवश्यक कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान, झोन अंतर्गत असे रुग्ण होम क्वारंटाईन मध्ये आहेत किंवा नाहीत याबाबत पडताळणी केली जाणार आहे. यासाठी त्यांच्या घरी आकस्मिक भेट देण्याकरिता झोन अंतर्गत भरारी पथक तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक झोनमध्ये दोन भरारी पथके तयार करण्यात येणार आहेत. ज्यामध्ये किमान चार सदस्यांचा समावेश असणार आहे. त्यातील दोन कर्मचारी हे उपद्रव शोध पथकातील (NDS) मधील असणार आहे.

याशिवाय रुग्ण होम आयसोलेशनमध्ये राहण्याकरिता सूचना देण्यात आल्यानंतर देखील संबंधित रुग्ण ते नियम पाळत नसल्यास त्यांच्यावर चौकशीअंती साथरोग अधिनियमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देखील नागपूर महापालिकेने दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 + 11 =

विस्मरणाचा असेल आजार तर एवढंच करा दुधामध्ये फक्त ‘ही’ चार पानं टाका Tadoba: सगळ्यांसमोर भिडले दोन वाघ, रक्तबंबाळ झाले अन्.. दररोज Squats करा; मिळतील ‘हे’ 7 अप्रतिम फायदे! फिरायचा प्लान करताय? मुंबईपासून काही अंतरावर असलेली ‘ही’ ठिकाणं करा Explore रम आणि ब्रँडीमध्ये ‘हा’ आहे फरक… ‘या’ 5 टेक्निक्सने Hip Fat झटपट करा दूर! Team India सोबत विमानात कोण होती ती ‘मिस्ट्री गर्ल’, पाहा PHOTO सनी देओल दिसला दारूच्या नशेत, व्हिडीओ व्हायरल… ‘Animal’ मध्ये रणबीरसोबत रोमान्स, अभिनेत्रीचा ग्लॅमरस-हॉट लुक पाहिला का? Top 10 बेस्ट केटो डाएट फॉलो करून करा Weight Loss Weight Loss: महिन्याभरातच कसं व्हायचं स्लिम-फिट? दररोज नारळ पाणी प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतात? Archies: नातवाचा ग्रँड डेब्यू; धाकट्या भावासोबत पहिल्यांदाच दिसले अमिताभ बच्चन! गाजराचा हलवा बनवताय? मग लक्षात ठेवा ‘या’ छोट्या टिप्स… डॉ. बाबासाहेबांबद्दल 10 खास गोष्टी, तुम्हाला किती माहितीये? तुमचं सौंदर्य चाळीशीतही राहील सुंदर अन् निरागस; फक्त ‘या’ 3 गोष्टी नेहमी करा फॉलो! Rashmika Mandanna टोन आणि फिट फिगरसाठी घेते ‘हे’ सीक्रेट डाएट! Weight Loss 6 Low-Calorie Dinner: रात्री जरा कमी जेवा, कारण… Daman: मुंबईपासून एकदम जवळ, Vacation साठी हटके लोकेशन ते ही अगदी स्वस्तात