आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेलेल्या नवरा-बायकोचा एकाच वेळी मृत्यू, काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Husband and Wife died at the same time in the bathroom: गाझियाबाद: होळी (Holi) खेळल्यानंतर बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेलेल्या जोडप्याचा अतिशय विचित्र पद्धतीने एकत्रच मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना ही गाझियाबादमधील मुरादनगरमध्ये घडली आहे. बाथरूममध्ये लावलेल्या गॅस गिझरमधून (Gas Geyser) निघणाऱ्या विषारी वायूमुळे पती-पत्नीचा (Husband-Wife) मृत्यू झाला असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. बाथरुमचा दरवाजा बंद असल्याने आणि योग्य वेंटिलेशन नसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. (a husband and wife who went to the bathroom after playing holi died at the same time)

या जोडप्याचा मृत्यू कसा झाला, त्यांचं नेमकं कारण काय, हे जाणून घेण्यासाठी आम्ही काही तज्ज्ञांशी खास बातचीत केली. गॅस गिझरमधून विषारी कार्बन मोनॉक्साईड वायू बाहेर पडला असावा, त्यामुळे या दाम्पत्याचा मृत्यू झाला असावा, अशी मत तज्ज्ञ डॉ. अमित गुप्ता यांनी व्यक्त केलं आहे. यासोबतच डॉ. अमित यांनी असे प्रकार टाळण्याचे उपायही सांगितले आहेत.

बाथरूममध्ये गॅस गिझर लावल्याने या जोडप्याचा मृत्यू कसा झाला हे जाणून घेण्यासाठी आम्ही डॉ. अमित गुप्ता यांच्याशी खास बातचीत केली. ते म्हणाले की, ‘बहुतेक मध्यमवर्गीय लोक पैसे वाचवण्यासाठी त्यांच्या बाथरूममध्ये गॅस गिझर लावतात. त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. त्याचा फायदा म्हणजे विजेचा वापर कमी होतो आणि पाणी लवकर गरम होते. पण बहुतेक लोकांच्या घरातील बाथरूममध्ये हवा खेळती राहण्यासाठी जागा नसते. अनेकजण गॅस गिझर हे त्यांच्या बाथरूममध्येच बसवतात. जे धोकादायक ठरू शकतं.

डॉ. अमित गुप्ता

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गॅस गिझरची प्रक्रिया काय असते?

डॉ. अमित म्हणाले, ‘यामधील प्रक्रिया अशी आहे की, गॅस गिझरमध्ये एलपीजी जाळतो, त्यामुळे उष्णता निर्माण होते. पण जेव्हा बाथरूममध्ये हवा खेळती नसते, तेव्हा ऑक्सिजनची कमतरता असते तेव्हा एलपीजी जळण्याची प्रक्रिया अपूर्ण होते. जेव्हा एखादी गोष्ट अपूर्णपणे जळते तेव्हा कार्बन डायऑक्साइडऐवजी कार्बन मोनोऑक्साइड तयार होतो. कार्बन मोनॉक्साईडचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्याला दिसत नाही आणि त्याचा वासही घेता येत नाही. तो हवेपेक्षा जड आहे आणि तळाशी जमा होऊ लागतो. आत आंघोळ करणार्‍याला गॅसची गळती होतेय हे देखील समजत नाही.

Air India च्या महिला वैमानिकाचा नाशिकमधे गॅस गिझरमुळे दुर्दैवी मृत्यू, गेल्या 10 दिवसातील दुसरी घटना

ADVERTISEMENT

ही आहेत लक्षणे

डॉ. गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, ‘त्याची सुरुवातीची लक्षणे डोकेदुखी, उलटी होणे, चक्कर आल्यासारखे वाटणे किंवा हृदयविकाराचा झटका अशी आहेत.’

ADVERTISEMENT

जोडप्याच्या बाबतीत नेमकं काय झालं?

डॉ. अमितच्या म्हणण्यानुसार, ‘त्यांनी अंघोळीच्या वेळेस गिझर चालू ठेवला असावा त्यावळी वायू गळती होऊन कार्बन मोनॉक्साईड तयार झाला असावा, पण त्याबाबत त्यांना काहीही कळालं नसेल. सुरुवातीला, त्याला डोकेदुखी जाणवली असावी, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असावं, उलटी होईल असं देखील त्यांना वाटलं असेल पण त्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केलं असावं. कदाचित नंतर कार्बन मोनोऑक्साइडचा थेट त्यांच्या मेंदूवर परिणाम झाला असेल. कार्बन मोनोऑक्साइडमध्ये ऑक्सिजनपेक्षा 200 ते 300 पट अधिक घातक असतो. कार्बन मोनोऑक्साइड संपूर्ण शरीरात पसरल्यावर तो फार घातक ठरतो. या प्रकरणातही असेच घडले असावे.

हे टाळण्याचे उपाय काय आहेत?

  • गॅस गिझर बाथरूमच्या बाहेर लावावा. फक्त आत तुम्ही टॅप किंवा त्याचे आउटलेट घेऊ शकता.

  • बाथरुममध्ये खिडकी असावी, नाहीतर एक्झॉस्ट फॅन असावा.

  • गॅस गिझर सुरु करून सगळ्यात आधी पाण्याची बादली भरून घ्यावी आणि अंघोळीला जाता गिझर बंद करावा. हा सर्वोत्तम पर्याय आहे.

कधी आग तर कधी ऑक्सिजन गळती… सरकार करतंय तरी काय?

दीपक गोयल (वय 40 वर्ष) हे त्यांची पत्नी शिल्पी (वय 35 वर्ष) आणि दोन लहान मुलांसोबत अग्रसेन मार्केटमध्ये राहत होते. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, होळी खेळल्यानंतर पती-पत्नी दोघेही दुपारी चारच्या सुमारास बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेले. तास उलटूनही ते बाहेर न आल्याने मुलांनी आवाज केला. त्यावेळी कुटुंबातील इतर काही लोकं तेथे पोहोचले. आतून आवाज न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा तोडून दोघांनाही बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले. सुरुवातीला त्यांना गॅस गिझर चालू असल्याचे दिसून आले. बाथरूममध्ये वेंटिलेशनची व्यवस्था नव्हती. दोघांनाही तात्काळ गाझियाबाद येथील रुग्णालयात दाखल केलं. पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. दुसरीकडे होळीच्या दिवशी घडलेल्या या घटनेने कुटुंबात खळबळ उडाली आहे.

‘पाईपच्या आकारामुळे झाली Oxygen गळती’

follow whatsapp

ADVERTISEMENT