आईला भेटायचंय म्हणत मनोरुग्णाने घेतला बसचा ताबा, पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अमरावतीच्या परतवाडा येथील बसस्थानकात आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका मनोरुग्णाने बसस्थानकात पार्क असलेल्या खासगी बसचा ताबा घेत, आईला भेटायला जायचंय असं सांगत बस चालवायला सुरुवात केली. पोलिसांनी वेळेतच या मनोरुग्णाला ताब्यात घेऊन मोठा अनर्थ टाळला आहे.

खासगी बस मालकाने दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी मनोरुग्णाने बसचा ताबा घेतला त्यावेळी बसमध्ये कोणताही प्रवासी नव्हता. बसचालक लघुशंकेसाठी गेल्याची संधी साधत या मनोरुग्णाने बस आपल्या ताब्यात घेत चालवायला सुरुवात केली. बसमालकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने तात्काळ परतवाडा पोलिसांना याबद्दलची माहिती दिली.

पोलिसांनीही घटनेचं गांभीर्य ओळखत एक ते दीड किलोमीटर प्रवास केल्यानंतर ही बस थांबवत या मनोरुग्ण तरुणाला ताब्यात घेतलं आहे. जय वर्धमान यादव असं या तरुणाचं नाव असून तो परतवाडाच्या जवळ कुंडली भागात राहतो. या मनोरुग्णाविरुद्ध पोलिसांनी IPC 379 आणि 511 अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भीषण… 30 वर्षीय मुलाने चावा घेत आईची करंगळीच तोडली!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT