मुंबई: बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकरणी त्याच्यांवर मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. तसंच सार्वजनिक स्थळी मास्क न लावल्याने देखील त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक ओबेरॉयने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता ज्यामध्ये तो वाहतुकीचे नियम तोडताना दिसत आहे. 14 फेब्रुवारीला बाइक चालवत असल्याचा हा व्हिडिओ विवेकने शेअर केला होता. यावेळी व्हिडिओत विवेक फिल्मी स्टाईलमध्ये बाइक चालवत असल्याचं दिसून आलं. पण तेव्हा त्याने हेल्मेट घातलं नसल्याने मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी त्याच्यावर तात्काळ कारवाई करत त्याला 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. यासाठी त्याला ई-चालान बजावण्यात आलं आहे. त्याला हे ई-चालान काल (19 फेब्रुवारी) संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास बजावण्यात आलं आहे.
https://t.co/lUzdbP55co
What a start of this lovely valentine's day with Main, Meri patni aur woh! A refreshing joyride indeed!
.
.
.@harleydavidson#WohAaGayi #HarleyDavidson #valentinespecial #loveforbikes #bikesofinstagram #loveandwheels#vroomValentine pic.twitter.com/THXrBllOVi— Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) February 14, 2021
याशिवाय विवेक विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच बाइक राइडवेळी विवेकने मास्क न घातल्याचे निदर्शनास आल्याने त्याच्यावर जुहू पोलिसांनी कोव्हिड-19 चे नियम भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
ही बातमी नक्की वाचा: कोरोना गेलाय अशा थाटात वागू नका, नाहीतर…
याप्रकरणी जुहू पोलीस स्थानकात विवेकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी मोटार वाहन कायद्याच्या कलम 129/177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कलम 21 महाराष्ट्र कोविड-19 उपाय 2020 नुसार देखील गुन्हा दाखल केला गेला आहे. याप्रकरणी जुहू पोलीस स्थानकाचे उपनिरिक्षक कांबळे हे याप्रकरणी अधिक तपास करत आहे.
दरम्यान, याचप्रकरणी तो जुहू पोलीस विवेकचा जबाब नोंदविण्यासाठी त्याच्या घरी देखील गेले होते. मात्र, विवेक दिल्लीला गेला असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.