कोरोना गेलाय अशा थाटात वागू नका, नाहीतर…
मुंबई: कोरोना या साथीच्या आजारामुळे गेल्या वर्षभरापूर्वी संपूर्ण जगावर एक अत्यंत भयंकर असं संकट आदळलं. साध्या सर्दी-खोकल्याने सुरुवात होणाऱ्या या साथीच्या आजाराने जेव्हा लोकांचं प्राण जाणं सुरु झालं, तेव्हा सरकारला देखील या संकटाकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष दिलं. मार्च 2020 या महिन्यात सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. यावरुन परिस्थिती किती गंभीर होती हे आपल्या […]
ADVERTISEMENT

मुंबई: कोरोना या साथीच्या आजारामुळे गेल्या वर्षभरापूर्वी संपूर्ण जगावर एक अत्यंत भयंकर असं संकट आदळलं. साध्या सर्दी-खोकल्याने सुरुवात होणाऱ्या या साथीच्या आजाराने जेव्हा लोकांचं प्राण जाणं सुरु झालं, तेव्हा सरकारला देखील या संकटाकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष दिलं. मार्च 2020 या महिन्यात सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. यावरुन परिस्थिती किती गंभीर होती हे आपल्या आजवर लक्षात आलं असेलच. पण लॉकडाऊन केल्यामुळे त्याचे विपरित परिणाम हे आर्थिक पातळीवर जाणवू लागले. म्हणूनच साधारण सप्टेंबर 2020 पासून हळूहळू काही निर्बंध हटविण्यात आले. दरम्यान, गेल्या काही काळात कोरोनाची रुग्ण संख्या ही बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली होती. त्यामुळे सरकारने आणि विशेषत: राज्य सरकारने सर्व व्यवहार सुरळीत होण्याच्या दृष्टीने बऱ्याच गोष्टींवरील निर्बंध हटवले. त्यामुळे लोकांचे दैनंदिन व्यवहार हे पुन्हा सुरु झाले. पण आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही अनपेक्षितरित्या वाढू लागली आहे. आज जर आपणही आपल्या आजूबाजूला पाहिलं तर लोकं ही कोरोनाबाबत फारशी काळजी घेत नसल्याचं दिसतं आहे. हीच गोष्ट अत्यंत धक्कादायक आहे.
‘कठोर निर्णय घ्यावे लागतील…’
‘कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. लोक मास्क वापरत नाही. याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल, त्यामुळे आताच याचा गांभीर्याने विचार करा. अथवा आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागतील. हे सगळं काळजी वाढवणारे आहे, उद्या मी मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार आहे, काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. अनेक देशात रुग्ण वाढल्याने पुन्हा लॉकडाउन करायला लागलं आहे. सध्या आपल्याकडील रुग्णवाढ ही देखील गंभीर आहे. त्यामुळे लोकांनी आता कठोर निर्णयाची मानसिकता ठेवावी. कारण कोरोना वाढ गंभीर आहे.’ अशी चिंता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. याचाच अर्थ राज्यातील कोरोनाशी निगडीत परिस्थिती फारशी चांगली नाही हे अधोरेखित झालं आहे.
हे जरुर वाचा: कोरोना लसीवर आरोग्य कर्मचाऱ्यांचा विश्वास नाही का?