संपलेल्या पक्षांना महत्त्व देत नाही, आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
मशिदीच्या भोंग्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरूद्ध शिवसेना असा वाद रंगला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी मशिदींवरच्या भोंग्यांचा प्रश्न उपस्थित करत ते तातडीने बंद केले पाहिजेत अशी मागणी केली. ते बंद झाले नाहीत तर आम्हाला हनुमान चालीसा पठण करावं लागेल तेही दुप्पट आवाजात असा इशाराही राज ठाकरेंनी दिला. या […]
ADVERTISEMENT

मशिदीच्या भोंग्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरूद्ध शिवसेना असा वाद रंगला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी मशिदींवरच्या भोंग्यांचा प्रश्न उपस्थित करत ते तातडीने बंद केले पाहिजेत अशी मागणी केली. ते बंद झाले नाहीत तर आम्हाला हनुमान चालीसा पठण करावं लागेल तेही दुप्पट आवाजात असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.
या सगळ्यानंतर मनसेने आज रामनवमीचं औचित्य साधत दादर येथील शिवसेना भवनासमोर हनुमान चालीसा पठण आणि धार्मिक गाणी लावली होती. त्यानंतर मनसेवर कारवाईही करण्यात आली. याबाबत आज आदित्य ठाकरेंना विचारलं असता संपलेल्या पक्षांना महत्त्व देत नाही असा खोचक टोला आदित्य ठाकरेंना त्यांच्याच काकांच्या पक्षाला म्हणजेच राज ठाकरेंच्या पक्षाला लगावला आहे.
रामनवमीचं औचित्य साधून मनसेने शिवसेना भवनासमोबर हनुमान चालीसा सुरू केली होती आणि धार्मिक गाणीही मोठ्या आवाजात लावली होती. पोलिसांनी त्या ठिकाणी पोहचत कारवाई केली आणि भोंगे तसंच कार जप्त केली. याबाबत पर्यावण मंत्री आदित्य ठाकरेंना विचारलं असता संपलेल्या पक्षाला मी महत्त्व देत नाही आणि स्टंटबाजीला भाव देत नाही असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं आहे.
Raj Thackeray Speech: राज ठाकरे यांचं पाडवा मेळाव्यातील भाषण जसंच्या तसं