राहुल गांधी म्हणाले चूक झाली आणि महाराष्ट्रात राजकारण पेटलं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: ‘आणीबाणी लावणं ही ‘चूक’ होती,’ अशी स्पष्टपणे कबुली दिल्यानंतर आता याचे राजकीय पडसाद हे आता महाराष्ट्रात उमटत आहेत. कारण राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी असं म्हटलं आहे की, ‘भाजपने देखील दिल्ली दंगलीबाबत माफी मागावी.’ याशिवाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील असं म्हटलं आहे की, आता ‘गोध्राबद्दल भाजप सरकारने माफी मागावी.’ त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये पुन्हा जुंपण्याची शक्यता आहे.

दिल्ली दंगल चूक होती हे भाजपने स्वीकारावं: नवाब मलिक

’45 वर्षांनंतर राहुल गांधी यांनी स्वीकारलं आहे की आणीबाणी ही चूक होती. दिल्ली दंगलीबाबत देखील काँग्रेसने माफी मागितली होती. त्याचप्रमाणे आता वर्षभरापू्र्वीच झालेली दिल्ली दंगल ही चूक होती हे भाजपने देखील स्वीकारावं.’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ग्रोधाबद्दल भाजप सरकारने माफी मागावी: नाना पटोले

‘राहुल गांधी यांनी आणीबाणीबद्दल माफी मागितली आहे. तशीच माफी आता भाजपने ग्रोधाबद्दल देखील मागावी.’ अस वक्तव्य नवाब मलिक यांनी केलं आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, या सगळ्या प्रतिक्रियांनंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी काँग्रेस नेत्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. पाहा नेमकं काय म्हणाले आशिष शेलार.

ADVERTISEMENT

गुजरात दंगलीवर भाजप माफी मागणार नाही: आशिष शेलार

‘गुन्हा आणि चूक असं सांगून राहुल गांधी पळ काढू शकत नाहीत. त्यांना सांगावं लागेल की त्यावेळी घेतलेला तो निर्णय देशासाठी घातक होता. गुजरात दंगलीत भाजपवर कोणताच गुन्हा दाखल झालेला नाही. तेव्हा भाजप या प्रकरणी माफी मागणार नाही.’ अशी प्रतिक्रिया आशिष शेलारांनी दिली आहे.

आणीबाणीबाबत राहुल गांधी यांनी नेमकं काय वक्तव्य केलंय?

‘मला वाटते की (आणीबाणी) ही एक चूक होती. पूर्णपणे ती चूक होती. आणीबाणीत जे घडले आणि आता जे घडतंय त्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. जे चूक होते आणि आता जे घडत आहे. कॉंग्रेस पक्षाने कधीही भारताला पकडण्याचा प्रयत्न केला नाही घटनात्मक चौकट. आमची रचना आम्हाला परवानगी देत नाही. आम्हाला ते करायचे असल्याससुद्धा आम्ही करू शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले. आणीबाणीमध्ये काँग्रेसने कधीही भारतातील संस्थात्मक रचनेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला नाही आणि स्पष्टपणे सांगायचं झाल्यास काँग्रेसकडे तशी क्षमता देखील नव्हती आणि भारताची जी संविधानात्मक रचना आहे ती याला परवानगीच देत नाही. जरी आपल्याला तसं करायचं असलं तरीही करता येत नाही.’ असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

दरम्यान, या सगळ्यावरुन आता मोठा राजकीय वाद सुरु होण्याची शक्यता आहे. अशावेळी भाजप आणि काँग्रेस

    follow whatsapp

    ADVERTISEMENT