Maharashtra legislature monsoon session: शिंदे -भाजप सरकारचं पहिलं अधिवेशन; ठाकरे गटाचे आमदार कुठे बसले? - Mumbai Tak - after shinde and bjp came to power this is the seating arrangement of opposition party members in the session - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

Maharashtra legislature monsoon session: शिंदे -भाजप सरकारचं पहिलं अधिवेशन; ठाकरे गटाचे आमदार कुठे बसले?

आजपासून महाराष्ट्र विधी मंडळात अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. 2019 सालच्या निवडणुकानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी मिळून महाविकास आघाडी करत सत्ता स्थापन केली होती. त्यादरम्यान भाजप अडीच वर्ष विरोधी बाकावर बसलं होतं. मात्र, शिंदेंच्या बंडानंतर शिंदे गट आणि भाजपने मिळून सरकार स्थापन केले. त्यानंतर हे पहिलेच अधिवेशन आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी जे सत्ताधारी […]

आजपासून महाराष्ट्र विधी मंडळात अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. 2019 सालच्या निवडणुकानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी मिळून महाविकास आघाडी करत सत्ता स्थापन केली होती. त्यादरम्यान भाजप अडीच वर्ष विरोधी बाकावर बसलं होतं. मात्र, शिंदेंच्या बंडानंतर शिंदे गट आणि भाजपने मिळून सरकार स्थापन केले. त्यानंतर हे पहिलेच अधिवेशन आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी जे सत्ताधारी बाकांवर बसले होते ते आता विरोधी बाकांवर बसले आहेत.

महाराष्ट्र विधानसभेतील आसनव्यवस्था

विरोधी बाकांवर –

पहिली रांग : नरहरी झिरवळ, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अजय चौधरी, आदित्य ठाकरे

दुसरी रांग : हसन मुश्रीफ, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील, धनंजय मुंडे, नाना पटोले, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव, रवींद्र वायकर.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून शिवसेनेत दोन गट पडलेत. अधिवेशन जाहीर झाल्यापासून ही चर्चा होती की शिवसेनेत दोन गट पडलेत त्यातले ठाकरे गटाचे आमदार कुठे बसणार?. त्यात आदित्य ठाकरे यांनी आम्ही विरोधी बाकावर बसणार असल्याचं सांगितलं आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंना पत्र पाठवून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानासाठी निमंत्रण दिलं होतं.

अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं काय आहे म्हणणं?

शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या विधानसभेच्या अधिवेशनात शिवसेनेचे नेतृत्व कोण करणार हे देखील स्पष्ट नाही. मुंबई तकला दिलेल्या विशेष मुलाखतीत, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले की, त्यांच्या कार्यालयाला अद्याप स्वतंत्र गट स्थापनेसाठी कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. त्यामुळे पूर्वीच्या नोंदीनुसार 55 आमदारांच्या घरात फक्त एकच शिवसेना अस्तित्वात आहे याचा विचार ते करतील, असं ते म्हणाले होते.

आदित्य ठाकरेंचा दावा

यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, विधानसभा अध्यक्षांनी काहीही म्हटलं तरीही त्यांची नेमणूक घटनाबाह्य आहे. लोकशाहीची हत्या करून बेकायदेशीर सरकार स्थापन करण्यात आलं आहे. आमदार सुनील प्रभू यांनी जारी केलेला शिवसेनेचा व्हीप लागू असून विधानसभेतील पक्ष कार्यालयावर आमचा दावा आहे.

‘सत्ताधारी बाकावर बसणारे गद्दार’ : आदित्य ठाकरे

सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसणारे शिवसेना नसून गद्दार आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, आदित्य ठाकरे आपल्या आमदारांच्या गटासह विधानसभेच्या पायर्‍यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतच्या आंदोलनात सामील झाले. त्यांनी एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारचा निषेध करत ‘ईडी सरकार’च्या घोषणा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × 1 =

‘नाना पाटेकरांची दहशत, दिग्दर्शकांना मारतात’, विवेक अग्निहोत्रींना कोणी भरवली धडकी? नशीब असावं तर असं! बकरी चरायला घेऊन जाणारा क्षणातच बनला कोट्यधीश भारताच्या इतिहासातील 10 सर्वात महान प्रभावी राजे कोणते? तुमच्या घरात फार काळ पैसा का टिकत नाही? भूकंप झाल्यानंतर नेमकी तीव्रता कशी मोजतात, रिश्टर स्केल म्हणजे काय? ‘या’ तारखांना जन्मलेले लोक बुद्धीने असतात हुशार, तुमची जन्म तारीख कोणती? सुंदर ते कोकण! ‘हे’ 10 नयनरम्य समुद्रकिनारे कुटुंबासोबत नक्की करा एक्सप्लोर नेमका काय असतो क्रॅश डाएट, ज्यामुळे गेला श्रीदेवीचा जीव? लाखो रूपयांच्या केशरची घरीच करा शेती, ‘ही’ सोपी पद्धत करा फॉलो! Mumbai मध्ये हँगआउट करण्यासाठी ही 10 ठिकाणं आहेत ‘बेस्ट’! Parineeti Chopra लग्नाच्या लुकवरून ट्रोल, कुणाला केलं कॉपी? टीना दाबीने आनंदाने सांगितली ही गोष्ट… IAS टीना दाबींच्या लेकाचा पहिला फोटो व्हायरल, काकांनी तर केले खूपच लाड! बिग बॉस फेम अभिनेत्रीला कोणी केली मारहाण? ‘तू माझे हृदय आहेस’, IAS रिया दाबीची रोमँटिक पोस्ट! श्रीदेवाची मृ्त्यूचं कारण बोनी कपूरने केलं उघड महात्मा गांधींनी बॅरिस्टर डिग्रीपर्यंतचं शिक्षण का घेतलं? Jio vs Airtel: 84 दिवस चालणारा सर्वात स्वस्त प्लान! समजून घ्या… मुस्लिम क्रिकेटर-हिंदू अभिनेत्री, लग्नावेळी मिळाल्या होत्या ठार मारण्याच्या धमक्या! सुवर्ण मंदिरातील ‘त्या’ व्हिडीओमुळे राहुल गांधी पुन्हा चर्चेत…