अजित पवार कानीकपाळी ओरडून सांगत होते मास्क लावा, ज्यांनी लावला नाही त्या सगळ्यांना झाला कोरोना
महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट आल्यात जमा आहे. कारण कोरोनाचे रूग्ण आणि ओमिक्रॉनचे रूग्ण वाढले आहेत. नेते मंडळीची, आमदारांचीही, विरोधी पक्षातल्या नेत्यांचीही पाठ कोरोना सोडताना दिसत नाहीये. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मंत्री, आमदार, विरोधी पक्षातले आमदार यांना कोरोना झाला आहे. अजित पवार विधानसभेत कानी कपाळी ओरडून सांगत होते की मास्क लावा. मात्र कुणीही त्यांचं ऐकलं नाही. […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट आल्यात जमा आहे. कारण कोरोनाचे रूग्ण आणि ओमिक्रॉनचे रूग्ण वाढले आहेत. नेते मंडळीची, आमदारांचीही, विरोधी पक्षातल्या नेत्यांचीही पाठ कोरोना सोडताना दिसत नाहीये. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मंत्री, आमदार, विरोधी पक्षातले आमदार यांना कोरोना झाला आहे. अजित पवार विधानसभेत कानी कपाळी ओरडून सांगत होते की मास्क लावा. मात्र कुणीही त्यांचं ऐकलं नाही. अखेर कोरोनाने या नेत्यांना गाठलंच अशी स्थिती आहे.
‘रोहितच मास्क वापरत नाही, म्हटलं अरे शहाण्या तू आता आमदार आहेस’, अजितदादांनी धरले रोहित पवारांचे कान
महाराष्ट्रातल्या कोणत्या राजकीय व्यक्तींना कोरोना?
महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना काही दिवसांपूर्वी कोरोना झाला. त्यांनी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विटरवर दिली होती.