Pradeep Sharma: माजी Encounter Specialist प्रदीप शर्मांना तळोजा जेलची एवढी भीती का वाटते?

मुंबई तक

मुंबई: अँटेलिया कार स्फोटक (Antilia bomb scare case) आणि मनसुख हिरेन हत्या (Mansukh Hiren Murder) प्रकरणात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना एनआयएने (NIA) अटक केली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने शर्मा यांना सोमवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. शर्मा यांची पोलीस कोठडी संपत आल्याने त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: अँटेलिया कार स्फोटक (Antilia bomb scare case) आणि मनसुख हिरेन हत्या (Mansukh Hiren Murder) प्रकरणात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना एनआयएने (NIA) अटक केली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने शर्मा यांना सोमवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. शर्मा यांची पोलीस कोठडी संपत आल्याने त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. यावेळी शर्मा यांनी त्यांना ठाणे तुरुंगात ठेवण्याची मागणी केली.

मनसुख हिरेन आणि अँटेलिया प्रकरणात अटक झालेले माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे, सुनिल माने, रियाझ काझी, पोलीस शिपाई विनायक शिंदे आणि त्यानंतर माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा या सर्वांना आता नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. पण प्रदीप शर्मा यांनी तळोजा आणि आर्थर रोड तुरुंगात जायला नकार दिला आहे.

जीवाला धोका असल्यामुळे ठाणे तुरुंगात ठेवण्याची मागणी त्यांनी कोर्टाकडे केली आहे. शर्मा यांना 28 जूनला कोर्टासमोर हजर केलं होतं. त्यावेळी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तेव्हा शर्मा यांनी कोर्टाकडे तळोजा आणि आर्थर रोड तुरुंगात न पाठविण्याची विनंती केली. कोर्टाने यावर तुरुंग प्रशासनाला निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पण आता या प्रकारानंतर असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे की शर्मा यांना तळोजा जेलमध्ये का नाही जायचं? तुरुंगात त्यांच्या जीवाला कोणापासून धोका आहे?

प्रदीप शर्मा यांची पूर्वीची ओळख ही चकमक फेम किंवा इन्काउंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी अशी होती. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी छोटा राजन आणि दाऊद इब्राहिम यांच्या टोळीतील अनेक गुंडांचं एन्काउंटर केलं होतं. तेव्हा याच टोळ्यांच्या गुंडांची शर्मा यांना भीती वाटत असावी असं बोललं जात आहे.

प्रदीप शर्मा यांनी दाऊदचा धाकटा भाऊ इकबाल कासकरला अटक केली होती. दाऊदच्याच टोळीतला अबू सालेमही सध्या तळोजा जेलमध्ये आहे. याव्यतिरिक्त दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन गँगचे काही लोकही आर्थर रोड आणि तळोजा जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत.

Pradeep Sharma: पोलीस अधिकारी ते शिवसेना नेता… कोण आहेत प्रदीप शर्मा?

तळोजा जेलमध्ये अरुण गवळीसुद्धा आहे. या व्यतिरिक्त तळोजा जेलमध्ये इंडियन मुजाहिद्दीनशी जोडलेले काही दहशतावदी शिक्षा भोगत आहेत. लष्करच्या-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याचा प्रदीप शर्मा यांनी एन्काउंटर केला होता.

लष्कर-ए-तोयबा ही इंडियन मुजाहिद्दीनशी संलग्न संस्था असल्यामुळेच शर्मा यांना तुरुंगातल्या या दहशतवाद्यांची भीती वाटत असावी. म्हणूनच त्यांनी या दोन्ही तुरुंगाऐवजी ठाणे तुरुंगात आपल्याला ठेवण्यात यावं अशी मागणी केली असल्याची चर्चा आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp