Mumbai Tak /बातम्या / BJP चा विश्वासघात केला म्हणणारे बच्चू कडू उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात गेलेच का होते?
बातम्या राजकीयआखाडा

BJP चा विश्वासघात केला म्हणणारे बच्चू कडू उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात गेलेच का होते?

BACCHU KADU Politics: मुंबई: ‘बच्चू भाऊ तुम्ही या गद्दारांबरोबर जायला नको होतं.’ असं म्हणत नाशिकमधील एका शेतकऱ्याने (Farmer) प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांना चांगलंच खिंडीत गाठलं. अशावेळी नेमकं काय उत्तर द्यावं याबाबत स्वत: बच्चू कडू हेच संभ्रमात दिसून आले. तब्बल अडीच वर्ष ज्या ठाकरे सरकारमध्ये (Thackeray Govt) बच्चू कडूंनी राज्यमंत्रिपद उपभोगलं. त्याच सरकारच्या सर्वेसर्वा असलेल्या उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) निवडणूक निकालानंतर भाजपची (BJP) साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या (Congress-NCP) सोबत जायला नको होतं असं बच्चू कडू आता का म्हणत आहेत? असे सवाल आता त्यांना विचारले जात आहेत. (bachchu kadu said shiv sena had betrayed bjp yet how did kadu get included in uddhav thackerays cabinet)

बच्चू कडू नेमकं काय म्हणाले हे आपण जाणून घेऊया..

नाशिक जिल्ह्यातील निफाडमधील एका शेतकऱ्याची भेट घेण्यासाठी बच्चू कडू हे गेले होते. यावेळी बच्चू कडूंना शेतकऱ्यांने थेट सुनावलं. शेतकरी म्हणाला की, ‘भाऊ तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहेत. या गद्दारांबरोबर जायला नको होतं. भाऊ, विधानसभेत तुम्हीच शेतकऱ्यांची बाजू मांडून आम्हा द्राक्ष, कांदा उत्पादकांना न्याय द्या.’

शेतकऱ्याने अचानक केलेल्या या विधाननंतर काही क्षण बच्चू कडू हे देखील अवाक् झाले. ते त्यावर म्हणाले की, ‘गद्दार म्हणजे काय.. उद्धव साहेब उभे होते आणि उद्धव साहेब भाजप-शिवसेनेचं पोस्टर लावून निवडून आले. बरोबर आहे? तुम्ही मतदान काय मारलं… नाही.. नाही आपण एकतर्फी नाही निष्पक्ष बोलू.’

‘आता तुम्ही आणि माझी युती आहे.. आपण ग्रामपंचायतला पॅनलला एकत्र आलो.. तुम्ही काय केलं की, मला सरपंच व्हायचंय. तर बच्चू कडूला सोडायचंय आणि तुम्ही लगेच काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात पकडला. त्यावेळी तुम्ही ज्याच्या सोबतीने निवडून आलात त्यांना तुम्ही सोडून दिलं. हे बरोबर आहे की नाही?’

‘आता मुख्यमंत्री होण्यासाठी तुम्ही ज्या लोकांना मत मारलं त्यांना तुम्ही सोडून दिलं की नाही दिलं.. म्हणजे उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सोडली का भाजपची साथ?’

‘तुम्ही-आम्ही ना राजकीय नेत्यांच्या एवढे आधीन झालोय की, आम्हाला बाप मेल्याचं दु:ख नाही… तर तुम्हाला नेत्याचं दु:ख आहे.’ असं म्हणत बच्चू कडूंनी शेतकरी इतरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बच्चू कडू यांचं म्हणणं काही या नागरिकांना पटलं नाही.

Bachchu Kadu: ‘बच्चू भाऊ गद्दारांबरोबर जायला नको होतं’, कोणी सुनावलं?

अडीच वर्ष मंत्रिपद भोगल्यानंतर बच्चू कडू यांना नवा साक्षात्कार?

राज्यात 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर कोणत्याही एका पक्षाला बहुमत नव्हतं. तसंच यावेळी अशी परिस्थिती होती की, कोणतेही दोन किंवा तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन झालं नसतं. त्यातच अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा पुढे करून शिवसेनेने भाजपला अडचणीत आणलं आणि त्याचवेळी समांतर पातळीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करण्याच्या चर्चा सुरू केल्या.

यावेळी भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष अपक्ष आमदार आपल्या बाजूला वळविण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत होते. अशा अटीतटीच्या क्षणी आमदार बच्चू कडू यांनी आपलं वजन उद्धव ठाकरेंच्या पारड्यात टाकलं. सत्ता स्थापन होण्याआधीच ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंची भेट घेऊन बच्चू कडूंनी आपला त्यांना पाठिंबा असल्याचं जाहीर केलं.

Bacchu kadu : ‘तुम्ही गद्दारी केली, डाकूंसोबत गेलात’; वृद्ध शेतकऱ्याने बच्चू कडूंना झापलं

त्याचदरम्यान, राज्यात 72 तासांसाठी फडणवीसांचं सरकार आलं तसंच पडलं देखील आणि त्यानंतर यथावकाश महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. सरकार सत्तेत आल्यानंतर जो पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यावेळी उद्धव ठाकरेंनी शब्द दिल्याप्रमाणे त्यांच्या कोट्यातून काही अपक्ष आमदारांना मंत्रिपदं दिली. त्यामध्ये बच्चू कडू यांना राज्यमंत्रिपद देऊ केलं. जे त्यांनी अडीच वर्ष उपभोगलं आणि त्यानंतर ते एकनाथ शिंदेंसोबत ठाकरेंविरोधातील बंडात सामील झाले. हे बंड यशस्वीही झालं. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देखील झाले. पण ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या बच्चू कडूंची झोळी मात्र अद्यापही रिकामीच आहे.

आता आपण बच्चू कडू काल (10 मार्च 2023) जे बोलले त्या मुद्द्याकडे येऊयात:

बच्चू कडू शेतकऱ्याला म्हणाले की, ‘आता मुख्यमंत्री होण्यासाठी तुम्ही ज्या लोकांना मत मारलं त्यांना तुम्ही सोडून दिलं की नाही दिलं.. म्हणजे उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सोडली का भाजपची साथ?’

‘त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात पकडला. त्यावेळी तुम्ही ज्याच्या सोबतीने निवडून आलात त्यांना तुम्ही सोडून दिलं. हे बरोबर आहे की नाही?’ असं कडू यावेळी म्हणाले.

आता बच्चू कडू यांच्या या संपूर्ण बोलण्याचा मतितार्थ असा होतो की, उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या साथीने निवडणूक लढवली. पण मुख्यमंत्रिपदासाठी त्यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ केलं.

Devendra Fadnavis : “माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहटीला गेले, त्यांच्यावर आरोप…”

बच्चू कडू यांच्या या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर काही प्रश्न उपस्थित होताहेत ते असे…:

  1. उद्धव ठाकरे भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी सत्तेची बोलणी करत आहेत हे जगजाहीर होतं. असं असतानाही बच्चू कडू यांनीच उद्धव ठाकरेंना आपला पाठिंबा दिला होता. त्यावेळी त्यांना उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचा विसर पडला होता का?

  2. उद्धव ठाकरेंनी मतदारांचा विश्वासघात केला असं म्हणणाऱ्या बच्चू कडूंनी त्यावेळी मग विधानसभेत उद्धव ठाकरेंच्या सरकारच्याच बाजूने मतदान का केलं?

  3. उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी भाजपची साथ सोडली नव्हती तर सत्तेसाठी भाजपला सोडलेलं.. असं बच्चू कडू म्हणाले.. तर अशा सरकारमध्ये बच्चू कडूंनी मंत्रिपद स्वीकारलंच कसं?

असे अनेक प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. तसंच गावोगावी बच्चू कडू आणि इतर आमदारांना या प्रश्नांची उत्तरं ही द्यावी लागत आहे. अशावेळी आगामी निवडणुकीत शिवसेनेचे 40 आमदार आणि इतर अपक्ष आमदार जनतेची कशी समजूत घालणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण हे तेच मतदार आहेत ज्यांच्या हातात एका दिवसासाठी का होईना पण सत्तेच्या चाव्या असतात!

‘…तर त्याला रट्टा दिला पाहिजे’, ‘मविआ’च्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंचं विधान

रक्षकच बनले भक्षक! पोलिसांचाच गॅगरेप पिडितेवर बलात्कार Uttar Pradesh: महिलेच्या हत्येचे गूढ 9 वर्षांनंतर एका पोपटाने उलगडलं… Shraddha Arya: बॉलिवूड अभिनेत्रीने पतीच्या वाढदिवसाला घातली बिकिनी, नेटकरी म्हणाले… प्रसुतीनंतर अभिनेत्रीचं अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं 10 किलो वजन! Amrita Ahuja: हिंडेनबर्गच्या अहवालात भारतीय वंशीय महिलेचं नाव, गंभीर आरोप 38 कोटींचा बेवारस चेक परत केला अन् जे मिळालं त्याने पायाखालची जमीन सरकली Twitter Blue tick: ब्लू टिकसाठी आता पैसे भरा, महिन्याला किती रुपये द्यावे लागणार? H3N2 Virus पासून बचावासाठी ‘या’ घरगुती गोष्टींचा आहारात करा वापर… MS Dhoni: आयपीएलमध्ये धोनी करणार गोलंदाजी? नेटमधील फोटो बघून चाहते बुचकळ्यात Anushka Sharma : ग्लॅमरस ड्रेस, पायात घुंगरांचं पैजण अनुष्काची यूनिक स्टाईल चाहत्यांना भावली वय अवघं 48…काजोल देवगणच्या बोल्ड लूकची चर्चा ‘भाबी जी घर पर हैं’ हा अश्लील शो आहे का? अंगूरी भाभी म्हणाली, ‘मी कधीही…’ हिंदू राष्ट्राचे स्वप्न महाराष्ट्रातूनच पूर्ण होईल: धीरेंद्र शास्त्री या 6 गोष्टी रोज करा.. आयुष्यभर आनंदाची खात्री Salman Khan: कोट्यवधींमध्ये फीस घेतो, तरीही राहतो 1BHK फ्लॅटमध्ये, घरात काय काय? ईशा अंबानीचा रॉयल लूक पाहतच राहाल… मोबाइल दुकानदारावर जडला जीव; पत्नीने रचला कट, पतीची निर्घृण हत्या! 4 फूट उंचीचा ‘तो’ रेसलर, WWE च्या रिंगमध्ये महिला रेसलरला केलेलं KISS बॉलिवूडच्या ललनाचा हॉट बॅकलेस अवतार गर्लफ्रेंडला परत मिळवण्यासाठी ठोठावला कोर्टाचा दरवाजा