लग्नासाठी चक्क बँकेत चोरी.. बोहल्यावर चढण्याऐवजी थेट तुरुंगात रवानगी

Crime: एका तरुणाने लग्नासाठी चक्क बँकेत चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार मध्यप्रदेशमध्ये उघडकीस आला आहे.
लग्नासाठी चक्क बँकेत चोरी.. बोहल्यावर चढण्याऐवजी थेट तुरुंगात रवानगी
bank robbery for marriage groom is going to be locked up crime (प्रातिनिधिक फोटो)

कटनी (मध्यप्रदेश): मध्य प्रदेशातील कटनी येथे पोलिसांनी एका तरुणाला चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. आरोपीला लग्नासाठी पैशांची गरज होती आणि त्यामुळेच त्याने चोरी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे. आरोपीकडून रोख रकमेशिवाय पोलिसांना चोरीच्या पैशाने खरेदी केलेला मोबाइल फोन आणि मोटारसायकलही जप्त केली आहे.

कटनी जिल्ह्यातील बरवारा इथे असलेल्या मध्यप्रदेश ग्रामीण बँकेत काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी बँकेची भिंत तोडून 1 लाख 27 हजार 212 रुपये चोरून नेले होते. ज्याची फिर्याद बँक व्यवस्थापकाने बरवारा पोलीस ठाण्यात दिली होती ज्यानंतर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी 72 तासात आरोपीला अटक करून पॅव्हेलियनऐवजी लॉकअपमध्ये पाठवलं आहे.

पोलीस ठाण्याचे प्रभारी अंकित मिश्रा यांनी ही बाब आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांच्या सूचनेवरून विशेष पथक तयार करून चोरट्यांचा शोध सुरू केला. यादरम्यान पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, बरवारा पोलीस स्टेशन हद्दीतील रोहनिया गावात राहणारा सुभाष यादव (वय 29 वर्ष) हा त्याच्या मित्रांना विनाकारण पार्टी देत ​​होता. पोलिसांनी संशयाच्या आधारे आरोपीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

बँकेतून 1 लाख 27 हजार 212 रुपयांची चोरी

पोलिसांच्या चौकशीत आरोपीने सांगितले की, त्याला लग्न करायचे होते आणि त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळेच त्याने संधी मिळताच 6 व 7 जानेवारीच्या रात्री मध्यप्रदेश ग्रामीण बँकेची भिंत तोडून तब्बल एक लाख 27 हजार 212 रुपयांची चोरी केली होती.

पोलिसांनी सांगितले की, चोरीसाठी खरेदी केलेला मोबाइल फोन आणि रोख 1 लाख 14 हजार रुपये आणि घटनेत वापरलेली एक दुचाकी आणि एक ब्रँडेड जॅकेट जप्त करण्यात आले आहे.

bank robbery for marriage groom is going to be locked up crime
बारामती: देवीच्या मंदिराचे दरवाजे तोडून दागिन्यांची चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद

आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून. आरोपीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आपले लग्न होणार असून आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अनेक दिवसांपासून बँकेत चोरी करण्याचा बेत असल्याचे आरोपीने सांगितले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in