किरीट सोमय्यांना कराडमध्ये रोखलं; मुश्रीफांचा आणखी एक घोटाळा आज करणार उघड
कोल्हापूरच्या दिशेने रवाना झालेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी साताऱ्यातच रोखलं. साताऱ्यातील कराड स्थानकावर किरीट सोमय्या यांना उतरवण्यात आलं आणि त्यानंतर पोलीस बंदोबस्तात कराडच्या शासकीय विश्रामगृहावर घेऊन जाण्यात आलं. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटी रूपयांच्या घोटाळ्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती. त्यांनंतर आरोपांचे पुरावे […]
ADVERTISEMENT

कोल्हापूरच्या दिशेने रवाना झालेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी साताऱ्यातच रोखलं. साताऱ्यातील कराड स्थानकावर किरीट सोमय्या यांना उतरवण्यात आलं आणि त्यानंतर पोलीस बंदोबस्तात कराडच्या शासकीय विश्रामगृहावर घेऊन जाण्यात आलं.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटी रूपयांच्या घोटाळ्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती. त्यांनंतर आरोपांचे पुरावे गोळा करण्यासाठी आपण मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कारखान्यावर जाणार असल्याचंही सोमय्यांनी म्हटलं होतं.
सोमय्यांनी कोल्हापुरात जाण्याबद्दल भाष्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात आले, तर वाईट परिणाम होतील असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या यांच्यासाठी कोल्हापूर बंदीचे आदेश काढले. मात्र, आदेश झुगारुन देत सोमय्या महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना झाले होते.
मुंबई सोडली… पुणेही ओलांडल, पण कराडवर रोखलं