मुंबई: दिव्यांग तरुणीचं अपहरण अन् बलात्कार! पुरावे मिटवण्यासाठी अंघोळ सुद्धा घातली अन्... आता, कोर्टाचा 'तो' निर्णय
मुंबई सत्र न्यायालयाने 25 वर्षीय मानसिकदृष्ट्या विकलांग महिलेचे अपहरण आणि बलात्कार केल्याप्रकरणी एका सलून कर्मचाऱ्याला 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दिव्यांग तरुणीचं अपहरण अन् बलात्कार!
पुरावे मिटवण्यासाठी अंघोळ सुद्धा घातली अन्...
आता, कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Mumbai Crime: मुंबई सत्र न्यायालयाने 25 वर्षीय मानसिकदृष्ट्या विकलांग महिलेचे अपहरण आणि बलात्कार केल्याप्रकरणी एका सलून कर्मचाऱ्याला 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. सत्र न्यायलयाने हा निर्णय देताना म्हटलं की, अपंग व्यक्तींच्या हक्क कायद्याअंतर्गत ही एक दुर्मिळ शिक्षा आहे.
न्यायालयाने पीडितेला 'उत्कृष्ट साक्षीदार' समजून आरोपीला बलात्कारासह अनेक आरोपांमध्ये दोषी ठरवण्यात आलं आहे. आरोपीला अपंग व्यक्तींच्या हक्क कायद्याच्या कलम 92(b) अंतर्गत एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असून त्यामध्ये अपंग व्यक्तीवर हल्ला किंवा बळाचा वापर समाविष्ट आहे. या शिक्षा एकाच वेळी लागू होणार असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं. या प्रकरणाबाबत मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितलं की, पीडिता शारीरिकदृष्ट्या 25 वर्षांची होती, परंतु तिचे सामाजिक वय अंदाजे सात वर्षे आणि दोन महिने होते. तसेच, तिचा आयक्यू 36 होता.
हे ही वाचा: मुंबई: स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून सिक्योरिटी गार्डची आत्महत्या! कांदिवली परिसरात खळबळ...
अपंग पीडितेवर लैंगिक अत्याचार
फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार, 29 एप्रिल 2019 रोजी, लोकसभा निवडणुकीत मतदान केल्यानंतर कुटुंबीय घरी परतले आणि तेव्हा पीडिता बेपत्ता आढळली. काही वेळानंतर, पीडिता रडत-रडत घरी परतली आणि तिने तिच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल सांगितलं. ती म्हणाली की, जवळच्या रस्त्यावर खेळत असताना, आरोपीने तिचा हात धरला आणि जबरदस्तीने तिला त्याच्या घराच्या वरच्या मजल्यावर नेलं. तेथे त्याने तिला चाकूने धमकावलं, उशीने तिचं तोंड दाबलं आणि तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नव्हे तर, पुरावे मिटवण्यासाठी आरोपीने पीडितेला साबणाने अंघोळ घातली होती.
हे ही वाचा: विद्यार्थीनीला वसतीगृहात जबरदस्ती नमाज पढायला लावला, पालघरमधील धक्कादायक प्रकार; गुन्हा दाखल
खटल्यादरम्यान, विशेष सरकारी वकील गीता शर्मा यांनी 14 साक्षीदारांची चौकशी केली. याबाबत मेडिकल एक्सपर्ट्सनी सांगितलं की, आरोपीने पीडितेला बलात्कारानंतर अंघोळ घातली असल्याने फॉरेन्सिक अहवाल अनिर्णीत होता. तसेच, लैंगिक अत्याचार केल्याने पीडितेच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्याचं झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं.










