जातीयवादी विद्वानांच्या तावडीतून छत्रपती शिवरायांची सुटका झाली पाहिजे-श्रीपाल सबनीस

साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि साहित्यिक श्रीपाल सबनीस यांचं परखड मत
जातीयवादी विद्वानांच्या तावडीतून छत्रपती शिवरायांची सुटका झाली पाहिजे-श्रीपाल सबनीस

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रातील जातीयवादी विद्वानांच्या तावडीतून सुटका झाली पाहिजे असं परखड मत साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केलं आहे. छत्रपती शिवराय : ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद आणि विवेकवादी भूमिका या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या वेळी ते नागपुरात आले होते. तिथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले श्रीपाल सबनीस?

"राजकारणातला, समाजकारणाताला, धर्मकारणातला विवेक संपलेला आहे. एकसंघ महाराष्ट्र हे माझं स्वप्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरुंवरून जो वाद मध्यंतरी निर्माण झाला त्यामध्ये जातीचे संदर्भ आहेत. ब्राह्मण समाजातल्या काही विद्ववानांचा आवडता गैरसमज आहे की ब्राह्मण हा श्रेष्ठ असतो. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामुळे त्या श्रेष्ठतेच्या संकल्पनेला तडा गेला. त्यामुळेच रामदास स्वामी यांचं नसलेलं गुरूपण, दादोजी कोंडदेव यांचं नसलेलं गुरूपण हे शिवाजी महाराजांच्या डोक्यावर स्थापित करण्यात आलं. हे ब्राह्मणी विद्वानांचं कारस्थान आहे."

जातीयवादी विद्वानांच्या तावडीतून छत्रपती शिवरायांची सुटका झाली पाहिजे-श्रीपाल सबनीस
शिवाजी महाराजांचे गुरू समर्थ रामदास होते का?

"मी म्हणतोय ते सगळ्या ब्राह्मण विद्वानांबाबत नाही. सेतू माधवराव पगडींना हे मान्य नाही, नरहर कुरुंदकरांना हे मान्य नाही. अ. रा कुलकर्णी यांनाही हे मान्य नाही. कुलकर्णी यांनी महाराष्ट्र शासनाला सही करून सांगितलं होतं की रामदास हे महाराजांचे गुरू नाहीत. पण गुरू नाहीत म्हणून ते शत्रूचे हेर होते का? काही ब्राह्मणेतर मंडळी रामदास स्वामींना औरंगजेबाचा हेर ठरवत आहेत. हेदेखील चुकीचं आहे. रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचं गुणगान करणाऱ्या रचना लिहिल्या. त्यांना संत माना की मानू नका पण ते जंत कसे ठरतील?"

छत्रपती शिवाजी महाराज.
छत्रपती शिवाजी महाराज.

"दोन्ही बाजूने (ब्राह्मण-ब्राह्मणेतर) विष पेरलं गेलं आहे. इतिहासाचं विकृतीकरण झालं आहे. मी विषाची छाटणी करू इच्छितो. तुमचं विष तुमच्या मनात ठेवा. तुमच्या भांडणात छत्रपती शिवरायांची एकात्म भूमिका होरपळू देऊ नका. महाराजांचा मृत्यू झाल्याची खात्री करून दोन्हीकडचे विद्वान उठले आणि त्यांनी इतिहासाचं विकृतीकरण केलं. त्यातून महाराष्ट्राची मुक्तता झाली पाहिजे. औरंगजेबाच्या कैदेतून महाराज सुटले पण आता दोन्हीकडच्या जातीयवादी विद्वानांच्या तावडीत ते अडकले आहेत. त्यांची सुटका करण्यासाठी धडपड करतो आहे."

Related Stories

No stories found.