खोदकाम सुरू असताना औरंगाबादमध्ये सापडली राणी व्हिक्टोरियाचं चित्र असलेली नाणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इसरार चिश्ती, प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरातील प्रियदर्शनी उद्यानात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम सुरू आहे. कामादरम्यान तब्बल 1689 ब्रिटिशकालीन नाणी सापडली सापडली आहेत ही नाणी वजन केले असता तब्बल दोन किलो वजनाची आहेत असंही सांगण्यात आलं आहे. ही सगळी नाणी औरंगाबाद महापालिका प्रशासनाने पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. स्मारकाच्या संरक्षण भिंतीचे काम एका एजन्सीला देण्यात आलं होतं यावेळी खोदकाम करताना ही नाणी सापडली आहेत. या नाण्यांवर ती इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया तिचे चित्र सुद्धा आढळून आले आहेत आणि सापडल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

खोदकाम सुरु असताना एका कापडी पिशवीत ही नाणी सापडली. पिशवीत आणखी एका जुनाट पिशवीत ही नाणी होती. त्यामुळे नाण्यांचा मातीशी काहीही संपर्क झाला आणि कोणतीही रासायनिक प्रक्रिया झाली नाही. सुरुवातीला ही नाणी तांब्याची असावीत अशी शंका आली. हे पडताळून पाहण्यासाठी ज्वेलर्सना बोलावण्यात आले. तपासणीत नाण्यांना अत्यंत उच्च प्रतीचा सोन्याचा मुलामा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्रिटिश काळातील सोन्याचा मुलामा इतका घट्ट होता की, खूप घासल्यानंतरही नाण्याचा रंग फिका पडत नसे.

ADVERTISEMENT

ही नाणी सव्वाशे वर्षांपूर्वीची असून त्यावर व्हिक्टोरिया राणीचा मुकूट आणि मुद्रा आहेत. एकूण दोन किलो वजनाच्या या नाण्यांवर 1881 चा स्पष्ट उल्लेख आढळतो.

ADVERTISEMENT

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या संरक्षण भिंतीचे काम रत्नगुरू एजन्सीसला मिळालेले आहे. पाठीमागील बाजूस जेसीबीने खड्डे खोदून त्यातील माती बाहेर काढत असताना सोमवारी संध्याकाळी अचानक नाण्यांचा खणखणाट झाला. पाहणी केली असता एका गाठोड्यात नाणी सापडली. काही नाणी खड्ड्यातही आढळून आली. कंत्राटदार रोहीत स्वामी यांनी वॉर्ड अभियंता व्ही. के. गोरे यांना ही माहिती दिली. त्यानंतर महापालिका आणि पुरातत्त्व विभागातर्फे ही नाणी नेमकी कोणत्या काळातील आहेत, कशाची आहेत, यासंबंधी तपास केला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT