पुण्यात लसींचा पत्ता नाही, पण नेते लसीकरणाचे होर्डिंग लावण्यात दंग!

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: पुण्यात (Pune) सध्या कोणत्याही निवडणुका (Election) नाही तरीही नेत्यांचे भले मोठे पोस्टर्स (Posters) मात्र सर्वत्र दिसत आहेत. पुण्यातील रस्त्यारस्त्यावर होर्डिंग (Hording) तर पाहायला मिळतच आहेत पण याशिवाय पुण्यातील लसीकरण केंद्रबाहेर (Vaccination Center) देखील राजकीय नेत्यांचे भले मोठे पोस्टर आता पाहायला मिळत आहेत. सध्या पुण्यात प्रमुख राजकीय पक्षांमध्ये लसीकरणाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु झालं आहे. यामुळे पोस्टर-होर्डिंग-बॅनर लावण्याची स्पर्धाच जणू पुण्यात लागली असल्याचं दिसून येत आहे.

खरं तर लसीकरण मोहीम ही सरकारकडून चालवली जात आहे. पण पुण्यातच काय तर अवघ्या महाराष्ट्रात लसींचा तुटवडा आहे. पण असं असताना पुण्यातील नेते मात्र लसीकरणाचे होर्डिंग लावण्यात दंग आहेत. दुसरीकडे पुण्यातील या पोस्टर वॉरमुळे पुणेकरांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे की, लसीकरणाची मोहीम नेमकी सुरु तरी कोणी केली?

या पोस्टर वॉरवर नागरी हक्क कार्यकर्ते विवेक वेलणकर म्हणतात की, ‘आमच्या लोकप्रतिनिधींमध्ये गांभीर्य व उत्तरदायित्वाचा अभाव आहे. लोकांना लसीकरणासाठी स्लॉट मिळत नाहीए. तर लसीकरण केंद्राबाहेर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. अशावेळी लोकांना नेते मंडळींकडून कोणतीही मदत मिळत नाही. यांनी खरं तर प्रयत्न करायला हवं की, लोकांना लसीकरणात कमीत कमी त्रास व्हावा. पण यांना फक्त पोस्टरवर झळकायचं आहे आणि लसीकरणाचं श्रेय घ्यायचं आहे.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सूत्रांच्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका या पुढील वर्षी होणार आहेत. अशा परिस्थितीत सर्व महत्वाचे राजकीय पक्ष यांचं याच निवडणुकांवर डोळा आहे. या निवडणुकीत प्रत्येक पक्षाला जास्तीत जास्त वर्चस्व मिळवायचं आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्ष भाजप आणि सत्ताधारी युती यांच्यात एक वेगळीच स्पर्धा पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्यात अधिकाधिक ताकद दाखविण्याचा प्रयत्न सध्या येथे सुरु आहे.

ADVERTISEMENT

पुणे महानगरपालिका सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या म्हणण्यानुसार, महानगरपालिकेत भाजपाची सत्ता असल्याने पुणे शहरात पोस्टर लावणे हा फक्त भाजप नेत्यांचा हक्क आहे. कारण कोरोना कालावधीत राज्य सरकारने पुणे शहरासाठी एक पैसाही दिलेला नाही. याउलट मुंबई महानगरपालिकेतील महाविकास आघाडी सरकारने प्रचंड आर्थिक मदत केली आहे. पुण्याला जे लसीकरण सुरु आहे ते देखील केंद्र सरकारने दिलेल्या लसीमधूनच. महाविकास आघाडी सरकारचं यामध्ये काहीही कर्तृत्व नाही. त्यामुळे पुण्यात पोस्टर्स लावण्याचा अधिकार फक्त भाजपलाच आहे.

ADVERTISEMENT

राजकारण करु नका,प्रत्येक कामाचे बोर्ड आणि झेंडे नको ! गडकरींचा भाजप नेत्यांना सल्ला

पुणे शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या मते, ‘गणेश बिडकर हे लोकांची दिशाभूल करीत आहेत. राज्य सरकार पुणे शहराला कशाप्रकारे मदत केली याचे सगळे आकडे लवकरच जाहीर करु. शहरात भाजप पोस्टरवर जो काही खर्च करीत आहे तो खरं म्हणजे पुणेकरांनी भरलेल्या करातून केला जात आहे. अंकुश काकडे यांच्या म्हणण्यानुसार, 2022 ची महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपा नेते पोस्टरवर स्वत:ला चमकवण्यात व्यस्त आहेत. महाविकस आघाडीचे नेते या कठीण काळात लोकांना मदत करण्यासाठी घाम गाळत आहेत.’ (competition for looting accolades over vaccination political parties involved in poster war)

पुण्यात लसीकरणावरुन देखील सुरु आहेत आरोप-प्रत्यारोप

पुण्यालगतच्या वाघोली येथे राहाणाऱ्या संजीव कुमार पाटील यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना सांगितलं की, ‘पुणे महानगरपालिका निवडणुका 2022 मध्ये होणार आहेत. यावेळी वाघोली ग्रामीण भाग हा पुणे महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट केला जाणार आहे. या भागातील अनेक जण आता नगरसेवक पदाच्या शर्यतीत उतरले आहेत आणि त्यांचेच फोटो आता पोस्टरवर झळकू लागले आहेत.’

यावेळी पाटील यांनी त्यांच्या येथील शिवसेनेचे स्थानिक नेते आबा कटके यांच्यावर काही गंभीर आरोप देखील केली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात तैनात असलेल्या एका अधिकारी डॉक्टरांच्या मदतीने जिल्हा परिषदेच्या परवानगीशिवाय आबा कटके यांनी तीन निवासी सोसायटींमध्ये लसीकरण केलं. पाटील यांच्या म्हणण्यानुसार एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात हे लसीकरण सुरु होतं. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकूनही माहिती दिली होती. त्याचवेळी शिवसेना नेते आबा काटके यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या मते, राजकीय द्वेषातून लोक त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करीत आहेत.

बोर्ड, पोस्टर लावू नका… गडकरींनी हात जोडून केली कार्यकर्त्यांना विनंती

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना हात जोडून आवाहन केलं होतं की, ‘कोरोना काळात राजकारण करु नका. केलेल्या प्रत्येक कामाचे बोर्ड आणि झेंडे लावण्याची गरज नाही…लोकांना ते फारसं आवडत नाही.’

‘तुम्ही कोरोनाची परिस्थिती जेवढी हलक्यात घेताय तेवढी ती नाहीये. आता सर्वांनी काळजी घेणं गरजेची आहे. रस्त्याची, पुलाची जी कोणती काम असतील ती घरातून करा. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा वापर करा. पार्टीची काम महत्वाची आहेतच…पण जीव वाचला तर पुढे काही कराल ना. महत्वाची गोष्ट म्हणजे कोरोनाच्या काळात राजकारण करु नका. केलेल्या प्रत्येक कामाचे बोर्ड आणि झेंडे लावण्याची गरज नाही. लोकांना ते फारसं आवडत नाही. तुम्ही जे कराल त्याचं क्रेडीट तुम्हाला मिळणारच आहे. सध्याच्या घडीला मीडिया स्ट्राँग आहे की तुमचं काम पोहचतं. पण एखादा ऑक्सिजन सिलेंडर द्यायचा आणि ४-४ वेळा त्याचे फोटो पाठवायचे असं करु नका. तुम्ही करत असलेल्या सेवाकामाची इतरांना माहिती मिळणं इथपर्यंत ठीक आहे पण त्याचा बागुलबूवा करु नका’, असं म्हणत गडकरींनी भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांना उपदेशाचा डोस पाजला होता.

पुणे जिल्ह्यात ‘या’ हॉस्पिटलमध्ये मिळणार कोरोनावरील लस, पाहा यादी

एकीकडे नितीन गडकरींसारख्या ज्येष्ठ नेत्याने कान टोचलेले असताना देखील पुण्यात मात्र भाजपच्या नेत्यांवर त्याचा काहीही परिणाम झाल्याचं दिसून आलेलं नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT