पंतप्रधान मोदींची नक्कल करणाऱ्या शाम रंगीलाविरोधात तक्रार दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. यावरच भाष्य करत कॉमेडियन श्याम रंगीलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करत एक व्हीडिओ तयार केला हा व्हीडिओ पोस्टही केला. मात्र या व्हीडिओवरून त्याच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. कारण शाम रंगीलाने ज्या पेट्रोलपंपावर व्हीडिओ पोस्ट केला होता त्या पेट्रोलपंप मालकाने शाम रंगीलाविरोधात तक्रार दाखल केली आहे. कॉमेडियन शाम रंगीलाने श्रीगंगानगरमधील हनुमानगड रोडवरच्या एका पेट्रोल पंपावर हा व्हीडिओ शूट केला होता. हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. ज्यानंतर पेट्रोल पंप मालक सुरेंद्र अग्रवाल यांनी शाम रंगीलाविरोधात तक्रार दाखल करत गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे.

काय आहे व्हीडिओमध्ये?

शाम रंगीलाने पोस्ट केलेल्या व्हीडिओमध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शैलीत पेट्रोलचं अभिनंदन केलं आहे. तसंच काही दिवसांमध्ये प्रति लिटर शंभर रूपये मागणी करणार आहे ती मागणीही जनता पूर्ण करेल असा विश्वास आहे असंही मोदींच्या आवाजात शाम रंगीलाने म्हटलं. हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पेट्रोल पंप मालक सुरेंद्र अग्रवाल यांनी रंगीलावर फोटो घेण्याची परवानगी घेऊन व्हीडिओ तयार केल्याचा आरोप केला आहे. कॉमेडियन शाम रंगीलाने तो पत्रकार असल्याचं सांगत मला फोन केला होता. त्याने माझ्याकडून फोटो काढण्याची संमती घेतली होती. मात्र १७ फेब्रुवारी संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान काही लोक बाईकवर आले आणि त्यांनी व्हीडिओ तयार केला. संबंधित लोक आले होते तेव्हा पेट्रोल पंपावर गर्दी होती. त्यामुळे त्याकडे आम्ही फारसं लक्ष त्याकडे दिलं नाही. असंही अग्रवाल यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT