मोठी बातमी ! राज्यात एक आठवड्यासाठी संपूर्ण लॉकडाउन लागण्याची शक्यता
महाराष्ट्रातली वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता येणाऱ्या काही दिवसांमध्ये एक आठवड्यासाठी संपूर्णपणे लॉकडाउन लावलं जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीमध्ये आज याचे संकेत दिले आहेत. राज्यात सध्या विकेंड लॉकडाउन लावण्यात आलेलं आहे. हवेच्या वेगाप्रमाणे कोरोनाचा प्रसार होतोय, राजेश टोपेंनी व्यक्त केली ही भीती सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. “लोकांना थोडीशी कळ सोसावीच लागेल, […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातली वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता येणाऱ्या काही दिवसांमध्ये एक आठवड्यासाठी संपूर्णपणे लॉकडाउन लावलं जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीमध्ये आज याचे संकेत दिले आहेत. राज्यात सध्या विकेंड लॉकडाउन लावण्यात आलेलं आहे.
हवेच्या वेगाप्रमाणे कोरोनाचा प्रसार होतोय, राजेश टोपेंनी व्यक्त केली ही भीती
सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. “लोकांना थोडीशी कळ सोसावीच लागेल, रुग्णसंख्या वाढत चालेलली आहे आणि आपल्याला निर्णय घ्यावाच लागेल. एका आठवड्यासाठी संपूर्ण लॉकडाउन लावून यानंतर हळूहळू थोड्याश्या सवलती देता येतील.” पण सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण लॉकडाउनला कोणताही पर्याय नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
पुणे : महाराष्ट्राला लसीची कमतरता भासणार नाही – प्रकाश जावडेकरांचं आश्वासन
विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण लॉकडाउनला विरोध करत राज्यातील गरीब जनतेचा विचार करा अशी विनंती केली होती. परंतू एकाच वेळी निर्बंधही लावायचे आणि सूटही द्यायची हे आता शक्य होणार नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यात आठवड्यासाठी लॉकडाउन लावण्यात येण्याचे संकेत दिलेत.
दरम्यान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण लॉकडाउनला विरोध करत लॉकडाउन लावल्याल लोकं भडकतील असा इशारा सरकारला दिला आहे. लॉकडाउन लावण्याच्या आधी लोकांना मदत मिळणार आहे की नाही हे त्यांना समजणं गरजेचं असल्याचंही फडणवीस म्हणाले. ज्याला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी किमान दोन दिवसांचा तरी कालावधी लागेल. पण तोपर्यंत काय करायचं हा प्रश्न आहेच..काही लोकं चुकीची माहिती पसरवत आहेत की कोरोना हा रोगच नाहीये. यासाठीच कडक निर्बंध लावणं गरजेचं आहे. मी स्वतः लसीचे दोन डोस घेतले आहेत. तरीही माझ्यात अजून अँटी बॉडीज तयार झालेल्या नाहीत. त्यामुळे या परिस्थितीवर लवकरच निर्णय घेणं गरजेचं असल्याचं म्हटलं.
सध्या होत असलेला विषाणूचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर लॉकडाउन हाच एक योग्य पर्याय असल्याचं मुख्यमंत्र्यांनी बैठकीत पुन्हा एकदा सांगितलं. त्यामुळे सर्वपक्षांनी एकमताने याबद्दल निर्णय घेणं गरजेचं असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमधल्या घटकपक्षांनीही यावेळी मुख्यमंत्र्यांना आपला पाठींबा दर्शवला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही लोकांचा जीव वाचवणं महत्वाचं असल्याचं सांगितलं. तसेच कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही आताच कटू निर्णय घेण्याची वेळ आली आहे, हे निर्णय आताच घेतले तरच परिस्थितीवर नियंत्रण येऊ शकतं. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य तो पर्याय निवडावा असं थोरात म्हणाले. दरम्यान अशोक चव्हाण यांनीही लॉकडाउनला पाठींबा दर्शवत फक्त घोषणा करत असताना गरीबांचा विचार करुन मधला रस्ता काढावा अशी विनंती केली.