'एकनाथ शिंदे मेहनती...' : बाळासाहेब थोरातांनी केलं मुख्यमंत्र्यांचं तोंडभरुन कौतुक - Mumbai Tak - congress leader balasaheb thorat praised chief minister eknath shinde - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

‘एकनाथ शिंदे मेहनती…’ : बाळासाहेब थोरातांनी केलं मुख्यमंत्र्यांचं तोंडभरुन कौतुक

Chief Minister Eknath Shinde news : नाशिक : “शिंदे साहेब आपण मुख्यमंत्री आहात. संधी मिळाली आहे, काम करत आहात. आता आमची संधी घालवली, पण गडी मेहनती हे काही विसरुन जाता येत नाही. जो वेळ मिळाला, जी संधी मिळाली त्यात तुम्ही लोकांसाठी काम करत आहे, हे आम्ही पाहतोय आणि ते नाकारता येत नाही”, असं म्हणतं काँग्रेसचे […]

Chief Minister Eknath Shinde news :

नाशिक : “शिंदे साहेब आपण मुख्यमंत्री आहात. संधी मिळाली आहे, काम करत आहात. आता आमची संधी घालवली, पण गडी मेहनती हे काही विसरुन जाता येत नाही. जो वेळ मिळाला, जी संधी मिळाली त्यात तुम्ही लोकांसाठी काम करत आहे, हे आम्ही पाहतोय आणि ते नाकारता येत नाही”, असं म्हणतं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं तोंडभरुन कौतुक केलं. (Congress leader Balasaheb Thorat praised Chief Minister Eknath Shinde)

ते नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे बोलत होते. नांदूर शिंगोटे येथे आज (18 मार्च) लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यातील अनेक मंत्र्यांसह राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्वपक्षीय आमदार आणि खासदारांची उपस्थिती होती.

बाळासाहेब थोरात काय म्हणाले?

मी एकदा गोपीनाथ मुंडेंकडे गेलो होतो. त्यांनी मला जवळ बसवून घेतलं. पुढे शिष्टमंडळ बसवून घेतलं. मी समस्या सांगितली, त्यावर त्यांनी पुढच्या ८ दिवसांत तोडगा निघेल, काळजी करु नका, असं आश्वासन दिलं. त्यांनी असं बघितलं नाही की मी काँग्रेसचा आमदार आहे. त्यांनी हे पाहिलं की एक लोकप्रतिनिधी येतो आणि आपल्याला शेतकऱ्यांचा व्यथा सांगतो, ते सोडवणं आपलं काम आहे अशी भूमिका त्यांनी घेतली.

मुंबईतील मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावर हे दगड का ठेवलेत? त्यांना काय म्हणतात?

मला आठवतं पंकजाताई मंत्री होत्या आणि दुपारी १२ च्या सुमारास जलसंधारणाच्या कामावर गेल्या. यावेळी त्यांनी एक सेल्फी काढला. माध्यमांनी चालवलं, मंत्र्यांना दुष्काळाचं गांभीर्य नाही, सेल्फी काढतात, वगैरे. यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी माझ्याकडे आले. मी त्यांना त्यावर एवढचं म्हटलं की एक तरुण मंत्री जर दुपारी बाराच्या उन्हात काम करत असेल आणि उत्साहाने सेल्फी काढतं असेल तर त्यात वावगं काही नाही. मला त्यावेळी गोपीनाथ मुंडे आठवले. काम करत असताना राजकारण बाजूला ठेवायचं ही गोष्ट ते शिकवून गेले आहेत, असही थोरात म्हणाले.

‘नाना पाटेकरांची दहशत, दिग्दर्शकांना मारतात’, विवेक अग्निहोत्रींना कोणी भरवली धडकी? नशीब असावं तर असं! बकरी चरायला घेऊन जाणारा क्षणातच बनला कोट्यधीश भारताच्या इतिहासातील 10 सर्वात महान प्रभावी राजे कोणते? तुमच्या घरात फार काळ पैसा का टिकत नाही? भूकंप झाल्यानंतर नेमकी तीव्रता कशी मोजतात, रिश्टर स्केल म्हणजे काय? ‘या’ तारखांना जन्मलेले लोक बुद्धीने असतात हुशार, तुमची जन्म तारीख कोणती? सुंदर ते कोकण! ‘हे’ 10 नयनरम्य समुद्रकिनारे कुटुंबासोबत नक्की करा एक्सप्लोर नेमका काय असतो क्रॅश डाएट, ज्यामुळे गेला श्रीदेवीचा जीव? लाखो रूपयांच्या केशरची घरीच करा शेती, ‘ही’ सोपी पद्धत करा फॉलो! Mumbai मध्ये हँगआउट करण्यासाठी ही 10 ठिकाणं आहेत ‘बेस्ट’! Parineeti Chopra लग्नाच्या लुकवरून ट्रोल, कुणाला केलं कॉपी? टीना दाबीने आनंदाने सांगितली ही गोष्ट… IAS टीना दाबींच्या लेकाचा पहिला फोटो व्हायरल, काकांनी तर केले खूपच लाड! बिग बॉस फेम अभिनेत्रीला कोणी केली मारहाण? ‘तू माझे हृदय आहेस’, IAS रिया दाबीची रोमँटिक पोस्ट! श्रीदेवाची मृ्त्यूचं कारण बोनी कपूरने केलं उघड महात्मा गांधींनी बॅरिस्टर डिग्रीपर्यंतचं शिक्षण का घेतलं? Jio vs Airtel: 84 दिवस चालणारा सर्वात स्वस्त प्लान! समजून घ्या… मुस्लिम क्रिकेटर-हिंदू अभिनेत्री, लग्नावेळी मिळाल्या होत्या ठार मारण्याच्या धमक्या! सुवर्ण मंदिरातील ‘त्या’ व्हिडीओमुळे राहुल गांधी पुन्हा चर्चेत…