पवार साहेब मोठे नेते आहेत, वय पाहून वॉर्निंग देऊन केतकीला सोडून द्यावं – पंकजा मुंडे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अभिनेत्री केतकी चितळेने आक्षेपार्ह शब्दांत केलेल्या टीकेमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. ठाणे कोर्टाने केतकीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी केतकी चितळेवर गुन्हा दाखल झाला असला तरीही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केतकीला एक वॉर्निंग देऊन सोडून द्यावं अशी मागणी केली आहे.

पवार साहेब हे मोठे नेते आहेत. तिच्या वयाचा विचार करता एक वॉर्निंग देऊन तिला सोडून द्यावं असं मत पंकजा मुंडेंनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

“सोशल मीडियाचा वापर कसा करायचा हा जरी व्यक्तीस्वातंत्र्याचा विषय असला तरीही सर्वांचा सन्मान झाला पाहिजे. टीका जरी करायची असली तरीही बिभत्सपणे करु नये. त्या पोस्टमध्ये बिभत्सपणा मला आढळला यासाठी मी त्याची निंदाच करते. मी राजकारण लहानपणापासून जवळून पाहिलं आहे. तेव्हा सोशल मीडिया नव्हता. लोकं पेपरमध्ये लिहायची. तेव्हाही अनेकदा भाषा घसरायची.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आम्ही अनेकदा बाबांना विचारायचो की अशा भाषेत लिहीलेलं तुम्ही सहन कसं करता? तेव्हा ते म्हणायचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतू आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वेगळा अर्थ काढला जातो आहे. परंतू सध्या तीच वय पाहता तिला एक वॉर्निंग देऊन सोडून द्यायला हवं. पवार साहेब मोठे नेते आहेत, असं पंकजा म्हणाल्या.

केतकी चितळेला दिलासा नाहीच! जामीन अर्जावरचा निर्णय कोर्टाने ठेवला राखून

ADVERTISEMENT

दरम्यान, बुधवारी ठाणे कोर्टाने केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर तिच्या वकीलांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला. सध्या केतकी गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात आहे. परंतू केतकीच्या जामीन अर्जावरचा निर्णय ठाणे कोर्टाने राखून ठेवला आहे. सरकारी पक्ष आणि तपास अधिकाऱ्यांची बाजू ऐकल्यानंतर कोर्ट या प्रकरणात आपला निर्णय देणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT