तिसरी लाट आटोक्यात! महाराष्ट्रातील सक्रीय रुग्णसंख्या 50 हजारांच्या आत, मुंबईलाही दिलासा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Number of corona patients increased in Maharashtra, death of nine covid positive patient
Number of corona patients increased in Maharashtra, death of nine covid positive patient
social share
google news

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंट पाठोपाठ राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं धडक दिली. मात्र, अवघ्या दीड महिन्यांच्या आतच तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. राज्यातील बहुतांश भागातील परिस्थितीत सुधारणा होत असून, आज राज्यात 3,502 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. मुंबईतही तीनशेच्या आत रुग्ण आढळून आले असून, ओमिक्रॉन रुग्णसंख्येत 218 नवीन रुग्णांची भर पडली आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे राज्यात दिवसभरात 3,502 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. दुसरीकडे 9,815 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या सक्रीय रुग्णसंख्या 47 हजार 905 इतकी आहे. आतापर्यंत राज्यात 78,42,949 कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यापैकी 76,49,669 रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात आज दिवसभरात 17 रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची राज्यातील संख्या 1,43,404 इतकी झाली आहे. राज्यात 2,94,500 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून, 2,380 व्यक्ती इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्याचा रुग्ण बरे होणाच्या दर 97.54 टक्क्यांवर पोहोचला आहे, तर कोरोना मृत्यूदर 1.82 इतका आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात दिवसभरात 218 नवीन ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची नोंद झाली आहे. यात मुंबईत 172 रुग्णांची नोंद झाली आहे, तर पुण्यात 30 रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत राज्यात 3,986 ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 3,334 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

मुंबईत आज एकच कोरोना मृत्यू

ADVERTISEMENT

मुंबईत दिवसभरात 288 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यात 253 रुग्ण लक्षणं नसलेले आहेत. त्याचबरोबर 35 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिलासादायक बाब म्हणजे मुंबईत आज कोरोनामुळे एकच मृत्यू नोंदवण्यात आला आहे. मुंबईत आतापर्यंत 16,683 कोरोना मृत्यू झाले आहेत.

ADVERTISEMENT

दिवसभरात मुंबईत 532 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 98 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर रुग्ण दुप्पटीचा कालावधीही 1,397 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईतील सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट होऊन ती 2,677 वर आली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT