कोरोनाचं पुन्हा थैमान! 24 तासांत 58 हजारांपेक्षा अधिक रुग्ण; ओमिक्रॉन रुग्णही 2 हजारांच्या पुढे
भारतात पुन्हा एकदा कोरोनाचं थैमान सुरू झालं आहे. देशात दररोजच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून, गेल्या 24 तासांत आढळून आलेल्या रुग्णसंख्येनं चिंतेत भर टाकली आहे. देशात 58 हजार 97 रुग्ण आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ओमिक्रॉन रुग्णांची संख्याही 2,000 च्या पुढे गेली आहे. कालच्या (4 जानेवारी) तुलनेत 24 तासांत आढळून आलेले रुग्ण 55.4 टक्के अधिक […]
ADVERTISEMENT

भारतात पुन्हा एकदा कोरोनाचं थैमान सुरू झालं आहे. देशात दररोजच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून, गेल्या 24 तासांत आढळून आलेल्या रुग्णसंख्येनं चिंतेत भर टाकली आहे. देशात 58 हजार 97 रुग्ण आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ओमिक्रॉन रुग्णांची संख्याही 2,000 च्या पुढे गेली आहे. कालच्या (4 जानेवारी) तुलनेत 24 तासांत आढळून आलेले रुग्ण 55.4 टक्के अधिक आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात मागील 24 तासांत देशात 58,097 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 24 तासांत 15,389 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येचा वेग वाढल्याने देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 2,14,004 वर पोहोचली आहे.
…तर जानेवारीत महाराष्ट्रात कोरोनाचे 80 लाख रूग्ण, राजेश टोपेंनी व्यक्त केली भीती
देशातील पाच राज्यांत सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात 18,466 रुग्ण, पश्चिम बंगालमध्ये 9,073 रुग्ण, दिल्लीत 5,481 रुग्ण, केरळात 3,640 रुग्ण तर तामिळनाडूमध्ये 2,731 रुग्ण आढळून आले आहेत.