शेजाऱ्याच्या गर्भवती पत्नीवर बलात्कार, आरोपीची बायको शूट करत होती VIDEO
Neighbors Pregnant Wife Rape: ओडिशा: ओडिशातील नबरंगपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीने 5 महिन्यांच्या गर्भवती महिलेवर बलात्कार (Rape) केला आहे. हा संपूर्ण प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर बलात्कारादरम्यान आरोपीच्या बायकोने (Wife) संपूर्ण घटनेचा व्हिडिओ (Video) शूट केला. वास्तविक पीडित महिलेवर बलात्कार करणारा आरोपी हा त्यांचा शेजारीच होता. पीडित महिलेचा पती […]
ADVERTISEMENT

Neighbors Pregnant Wife Rape: ओडिशा: ओडिशातील नबरंगपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीने 5 महिन्यांच्या गर्भवती महिलेवर बलात्कार (Rape) केला आहे. हा संपूर्ण प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर बलात्कारादरम्यान आरोपीच्या बायकोने (Wife) संपूर्ण घटनेचा व्हिडिओ (Video) शूट केला. वास्तविक पीडित महिलेवर बलात्कार करणारा आरोपी हा त्यांचा शेजारीच होता. पीडित महिलेचा पती आणि आरोपी यांच्यात काही गोष्टीवरून मतभेद होते. याच भांडणामुळे शेजाऱ्याचा बदला घ्यावा यासाठी आरोपीने हे भयंकर कृत्य केलं. ज्यामध्ये आरोपीला त्याच्या पत्नीने देखील साथ दिली. (crime neighbors pregnant wife raped for revenge the accuseds wife was shooting the video)
मिळालेल्या माहितीनुसार, बलात्कारानंतर आरोपी आणि त्याच्या पत्नीने संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि आपण बदला घेतल्याचंही तिने त्या पोस्टवर लिहिलं. सध्या या संपूर्ण प्रकरणात 38 वर्षीय आरोपी आणि त्यांची 35 वर्षीय पत्नी जी आशा वर्कर आहे यांना अटक करण्यात आली आहे. खरं तर पीडित महिला ही आरोपीची नात्यातील वहिनी आहे.
ही संपूर्ण घटना 28 फेब्रुवारी रोजी घडली होती. ज्याचा प्रचंड मानसिक धक्का पीडित महिलेला बसला होता. पण या सगळ्याबाबत त्यावेळी त्यांनी पोलिसात तक्रार केली नव्हती. मात्र, 13 मार्च रोजी पीडित महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने अखेर तिच्या कुटुंबीयांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. याबाबत स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक कुमार लेंका यांनी सांगितले की, ‘आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत.’
कल्याण: वासनांध प्रियकर-प्रेयसी, अल्पवयीन भाऊ-बहिणीवर प्रियकर-प्रेयसीकडून वारंवार बलात्कार
आजोबांनी अल्पवयीन नातीवर केला बलात्कार
दुसरीकडे, बलात्काराचीच एक चीड आणणारी घटना ही उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. नात्याला काळीमी फासणाऱ्या बलात्कारासारख्या घटनांमध्ये मागील काही दिवसात सर्रास वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्येही अशीच एक घटना आता समोर आली आहे.
धक्कादायक.. लग्न घरी आलेल्या काकीवर 22 वर्षीय वासनांध पुतण्याकडून बलात्कार
येथे एका वासनांध आजोबांनेच आपल्या अल्पवयीन नातीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. एवढेच नव्हे तर हे घृणास्पद कृत्य केल्यानंतर त्याने आपल्या नातीला 10 रुपये देत सांगितलं की, यातलं तुझ्या आईला काहीही सांगू नको. मात्र, जेव्हा आरोपी आजोबा हा नातीवर अतिप्रसंग करत होता त्याचवेळी गावातील व्यक्तीने त्याला पाहिलं आणि आरडाओरडा केला. त्यामुळे आजूबाजूचे अनेक लोक तेथे जमा झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात महिलाही आल्या. ज्यांनी आरोपी वृद्धाला बेदम मारहाण केली आणि नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
VIDEO: मुली-महिलांना पाहताच वासनांध तरूण करतो Kiss, सीरियल किसरची दहशत