ऐतिहासिक वारसा इमारती जवळील मेट्रो-3च्या पॅकेज-1चं 96 टक्के भुयारीकरण मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे पूर्ण करण्यात आलं आहे. आज या पॅकेज अंतर्गत भुयारीकरणाचा 37वा टप्पा यशस्वीरीत्या पार पडलाय. यामध्ये हुतात्मा चौक ते सीएसएमटी हा डाऊनलाईन मार्गाचा 569 मी. भुयारीकरणाचा टप्पा एकूण 418 रिंग्जच्या सहाय्याने 106 दिवसांमध्ये पूर्ण झाला.
या भुयारीकरणासह पॅकेज-1 मधील कफ परेड ते सीएसएमटी दरम्यान एकूण 2.9 किमी लांबीचे डाऊनलाईनचं भुयारीकरण पूर्ण झालं आहे. सूर्या-2 या रॉबिन्स बनावटीच्या ड्युएल-मोड हार्ड-रोक टनेल बोअरिंग मशीनद्वारे हे भुयारीकरण पूर्ण करण्यात आलं आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ऐतिहासिक वारसा इमारती आणि समुद्राजवळ भुयारीकरण करणं आव्हानात्मक आहे. मात्र आमच्या अभियंत्यांच्या आणि कामगारांची उत्कृष्ट टीम हे शिवधनुष्य लीलया पेलत आहे. मला आनंद आहे की, ऐतिहासिक वारसा इमारती जवळून भुयारीकरण करताना सर्व सुरक्षेविषयी दक्षता घेत पॅकेज -1चं आतापर्यंत 96% भुयारीकरण पूर्ण झालंय.”
तर मेट्रो-३ प्रकल्पासाठी आतापर्यंत एकूण 95% भुयारीकरण पूर्ण झालं आहे. पॅकेज-1 अंतर्गत कफ परेड, विधान भवन, चर्चगेट आणि हुतात्मा चौक या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. आतापर्यंत या पॅकेज अंतर्गत सहा भुयारीकरणाचे टप्पे पूर्ण झालेत. पॅकेज-१ च्या भुयारीकरणाचा तपशील: