उपमुख्यमंत्री Ajit Pawar थेट शिवसेनेच्या शाखेत, एवढा बदल झाला तरी कसा?
पंढरपूर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे सध्या आपल्या पक्ष वाढीसाठी खूपच झटत असल्याचं दिसतं आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi Govt) अस्तित्वात असल्याने त्याचा नेमका फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) कसा होईल यासाठी अजित पवार हे कसोशीने प्रयत्न करत आहेत. खरं तर कधीकाळी भाजपच्या (BJP) गोटात जाऊन थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे […]
ADVERTISEMENT

पंढरपूर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे सध्या आपल्या पक्ष वाढीसाठी खूपच झटत असल्याचं दिसतं आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi Govt) अस्तित्वात असल्याने त्याचा नेमका फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) कसा होईल यासाठी अजित पवार हे कसोशीने प्रयत्न करत आहेत. खरं तर कधीकाळी भाजपच्या (BJP) गोटात जाऊन थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे अजित पवार हे काल (16 एप्रिल) चक्क शिवसेनेच्या एका शाखेत (Shiv Sena Shakha) गेले. येथील त्यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात काल शेवटची प्रचारसभा पार पडल्यानंतर अजित पवार हे थेट मंगळवेढ्यातील शिवसेना शाखेत गेले. यावेळी त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते देखील उपस्थित होते. खरं तर ही निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढत आहे. त्यामुळे थेट शिवसेना शाखेत जाऊन अजित पवारांनी शिवसेनेच्या मतदारांपर्यंत योग्य तो मेसेज या निमित्ताने पोहचवला आहे. मात्र, अजित पवारांमध्ये एवढा मोठा बदल नेमका झाला तरी कसा हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
Ajit Pawar Pandharpur: ‘सरकार बदलणारा जन्माला यायचा आहे, आपला नाद करायचा नाय…’, अजितदादांचा फडणवीसांना इशारा
23 नोव्हेंबर 2019… अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा भल्या सकाळचा शपथविधी…
राज्यातून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे विधानसभा 2019 निवडणुकीच्या निकालानंतर पुढे सरसावले होते. यासाठी त्यांनी शिवसेनेच्या साथीने राज्यात सत्ता स्थापनेची तयारी देखील केली होती. पण अचानक 23 नोव्हेंबर 2019 या दिवशी भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी आटोपला होता. खरं तर या शपथविधीमुळे महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेच्या स्वप्नांना सुरुंग लागला होता.
अजित पवारांविरोधात तीव्र नाराजी
अजित पवारांच्या अशा प्रकारच्या कृतीमुळे तीनही पक्षात त्यांच्याविरुद्ध प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती. सामान्य कार्यकर्ते तर आपल्यासोबत दगाबाजी झाली असल्याचीच भावना व्यक्त करत होते. मात्र, या सगळ्या राजकारणादरम्यान, तीनही पक्ष हे एकत्र राहिले फडणवीस-अजित पवारांच्या या सरकारविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे देखील ठोठावले. त्याच दरम्यान बहुमत नसल्याने फडणवीसांचं सरकार हे अवघ्या 72 तासात कोसळलं.
राज ठाकरेंसारखीच फडणवीसांनीही केली अजित पवारांची नक्कल!
पुन्हा महाविकास आघाडीत स्थान
यथाअवकाश अजित पवार हे देखील पुन्हा एकदा महाविकास आघाडीत परतले. परंतु इतर दोन पक्षात त्यांच्याविषयी असणारी नाराजी काही कमी झाली नव्हती. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या पहिल्या शपथविधीमध्ये त्यांना समाविष्ट करुन घेण्यात आलं नव्हतं.
मात्र, जसजसं महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थिरस्थावर झालं तसतसं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारमध्ये आपलं स्थान भक्कम केलं. तसंच दोनही पक्षात त्यांच्याविषयी नाराजी देखील त्यांनी दूर केली.
आता थेट देवेंद्र फडणवीसांविरुद्धच टीका
आता पंढरपूर-मंगळवेळा पोटनिवडणुकीत तर त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांनाच शिंगावर घेतलं आहे. अजित पवारांच्या याच भूमिकेमुळे आता सर्वांना पुन्हा एकदा आश्चर्य वाटू लागलं आहे. कारण, वर्षभरापूर्वी ज्या देवेंद्र फडणवीसांसोबत जात अजित पवारांनी शपथविधी पार पाडला होता ते अजित पवार आता भाजपवर टीका करतात. एवढंच नव्हे तर थेट शिवसेनेच्या शाखेत देखील जातात.
‘आपलं नाणं खणखणीत, कारण आपल्या मागं चुलता उभा हाय’, अजित पवारांचा खास VIDEO
खरं तर उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून अजित पवार यांना मंत्रिमंडळात आपल्या पद्धतीने काम करता येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळेच अजित पवारांमध्ये एवढा मोठा बदल झाला असल्याची चर्चा आहे.