फडणवीस भल्या सकाळी RSS मुख्यालयात भागवतांच्या भेटीला; चर्चाना उधाण
नागपूर: राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (11 मार्च) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि मोहन भागवत यांच्यात जवळजवळ 30 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन काल (10 मार्च) संध्याकाळी संपलं. दरम्यान, आज भल्या सकाळी नागपूरमध्ये […]
ADVERTISEMENT

नागपूर: राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (11 मार्च) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली.
यावेळी देवेंद्र फडणवीस आणि मोहन भागवत यांच्यात जवळजवळ 30 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन काल (10 मार्च) संध्याकाळी संपलं. दरम्यान, आज भल्या सकाळी नागपूरमध्ये जाऊन फडणवीसांनी मोहन भागवत यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीविषयी जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, ही भेट नेमकी का घेण्यात आली होती आणि यावेळी काय चर्चा झाली हे अद्यापही गुलदस्त्याच आहे.
दुसरीकडे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा असा दावा केला आहे की, ‘राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार तीन महिन्यात पडेल. तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ हे सरकार टिकणं आणि टिकवणं ही कोणत्याही राजकीय पक्षाची घोडचूक ठरेल.’ त्यामुळे भाजप पुढील 3 महिन्यात परत सत्तेत येणार असल्याचं सूतोवाच मुनगंटीवार यांनी केलं आहे.