आज महाराष्ट्राचं बजेट सादर करण्यात आलं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत हे बजेट सादर केलं. या अर्थसंकल्पामध्ये सरकारने आरोग्य सुविधांवर विशेष भर दिला आहे. तसंच महिला दिनाच्या दिवशी हे बजेट सादर करण्यात आलं त्यामुळे या दिवसाचं औचित्य साधत महिलांसाठीही काही घोषणा करण्यात आल्या.
रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारं Budget सादर-मुख्यमंत्री
आपण पाहुयात या बजेटमधले महत्त्वाचे १० मुद्दे
१) नागरी आरोग्य संचालक कार्यलयांची निर्मिती, दर्जेदार आरोग्यसेवा उद्दीष्ट एकूण ५ हजार कोटींची तरतूद यापैकी ८०० कोटी यावर्षी दिले जाणार
२) विविध आरोग्य सेवांसाठी ७ हजार ५०० कोटींची तरतूद
३) शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंत कर्ज घेऊन नियमित परतफेड करणाऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज देणार
४) विकेल ते पिकेल या योजनेसाठी २१०० कोटी बाजार साखळी तयार केली जाणार
५) समृद्धी महामार्गाचं काम ४४ टक्के पूर्ण. नागपूर ते शिर्डीचा रस्ता १ मे पासून खुला करण्यात येणार
६) मुंबईतल्या ईस्टर्न फ्री वे ला विलासराव देशमुख यांचं नाव
Budget : महिलांच्या नावे घराची नोंदणी झाल्यास मुद्रांक शुल्कात सुट
७) पुण्याबाहेर रिंग रोडची उभारणी १७० किमी, भूसंपादनाचं काम यावर्षी केलं जाणार
८) विविध आवास आणि घरकुल योजनांसाठी ६ हजार ८२९ कोटींची तरतूद
९) प्रत्येक जिल्ह्यात राजीव गांधी विज्ञान पार्क उभारणार
१०) बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकांसाठी ४२१ कोटींची तरतूद
११) राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना, कुटुंब घर विकत घेताना महिलेच्या नावाने नोंदणी करण्यास प्रोत्साहन, मुद्रांक शुल्कात १ टक्क्याची सवलत
१२) संत जनाबाई सामाजिक सुरक्षा आणि कल्याण योजना, घरकाम करणाऱ्या असंघटित क्षेत्रातल्या महिलांसाठी २५० कोटी बीज भांडवलाची तरतूद