रामदेव बाबाच्या शिबिरात भेट अन्…; नवनीत राणा आणि रवी राणांच्या लव्हस्टोरीचा किस्सा
सध्या महाराष्ट्रात आणि मुंबईत हनुमान चालीसा हा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. त्याचं कारण आहे ते म्हणजे नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दिलेलं आव्हान. त्यानंतर झालेला संघर्ष आणि त्यानंतर राणा दाम्पत्याला झालेली अटक. या दोघांमुळे सध्या हनुमान चालीसा प्रकरण गाजतं आहे. अशात चर्चेत असणाऱ्या राणा दाम्पत्याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या दोघांचं लग्न कसं जमलं […]
ADVERTISEMENT

सध्या महाराष्ट्रात आणि मुंबईत हनुमान चालीसा हा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. त्याचं कारण आहे ते म्हणजे नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दिलेलं आव्हान. त्यानंतर झालेला संघर्ष आणि त्यानंतर राणा दाम्पत्याला झालेली अटक. या दोघांमुळे सध्या हनुमान चालीसा प्रकरण गाजतं आहे. अशात चर्चेत असणाऱ्या राणा दाम्पत्याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या दोघांचं लग्न कसं जमलं त्यांची लव्ह स्टोरी कशी आहे? हे आपण जाणून घेऊ.
रवी राणा आणि नवनीत यांची ओळख २००९ ते २०११ च्या दरम्यान मुंबईत झाली. रवी राणा यांचे भाऊ सुनील राणा यांनी सांगितलं की २००९ मध्ये पहिल्यांदाच रवी राणा हे बडनेरातून आमदार झाले. रवी आणि नवनीत यांची ओळख बाबा रामदेव यांच्या शिबीरातून झाली होती.
त्यावेळी रवी राणा आमदार होते तर नवनीत कौर या अभिनेत्री, मॉडेल होत्या. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आणि भारतीय सिनेसृष्टीत नवनीत यांनी काम केलं आहे. रामदेवबाबांच्या योग शिबिरात या दोघांची ओळख झाली. या ओळखीचं रूपांतर पुढे मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झालं. त्या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न साधेपणाने करायचं असा निर्णय रवी राणा यांनी घेतल्याचं त्यांच्या भावाने म्हणजेच सुनील राणा यांनी म्हटलं आहे.