प्रेमप्रकरणातून जन्माला आलेल्या मुलीची सात लाखांना विक्री, डॉक्टरसह दलालाला अटक
– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी सरोगसीच्या नावावर प्रेमप्रकरणातून जन्माला आलेल्या नवजात मुलीची सात लाखांना विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणात डॉक्टर आणि दलालाला अटक केली आहे. तसेच ज्या दाम्पत्याने या मुलीला विकत घेतलं त्या दाम्पत्यालाही पोलिसांनी मुलीसह हैदराबादवरुन ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या एका महिलेला प्रेम प्रकरणातून गर्भधारणा झाली […]
ADVERTISEMENT

– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी
सरोगसीच्या नावावर प्रेमप्रकरणातून जन्माला आलेल्या नवजात मुलीची सात लाखांना विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणात डॉक्टर आणि दलालाला अटक केली आहे. तसेच ज्या दाम्पत्याने या मुलीला विकत घेतलं त्या दाम्पत्यालाही पोलिसांनी मुलीसह हैदराबादवरुन ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या एका महिलेला प्रेम प्रकरणातून गर्भधारणा झाली होती. अनैतिक संबंधातून झालेल्या गर्भधारणेमुळे गर्भपाताकरता त्या महिलेने आरोपी डॉ. विलास भोयर यांना संपर्क साधला होता. त्याच दरम्यान हैदराबाद येथील एका दाम्पत्याला मूलबाळ होतं नसल्याने सरोगसीच्या माध्यमातून बाळ जन्माला घालण्याची त्यांची इच्छा असल्याची माहिती डॉक्टर भोयरला मिळाली. त्यानंतर डॉक्टरने त्या महिलेला बाळ जन्माला घालण्यासाठी राजी करून घेतले, अर्थात या कामाच्या मोबदल्यात मोठी रक्कम मिळेल असे आश्वासनही दिलं.
बाळाला जन्म देण्यासाठी महिला तयार झाल्यानंतर आरोपी डॉक्टरने हैदराबाद येथील दाम्पत्याला संपर्क साधून सरोगेसी गर्भधारणे करीता एक महिला तयार असल्याची माहिती दिली. त्याकरीता डॉक्टरने सात लाख रुपये वसूल केले होते. त्या दाम्पत्याला संशय येऊ नये म्हणून डॉक्टरने त्यांच्यावर उपचार सुरू करून त्यांचे शुक्राणूही मिळवले होते.
Pune Crime: मुलीला त्रास देतो म्हणून तरुणाला मारहाण, उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू
२८ जानेवारी रोजी नागपूरमधील महिलेने एका मुलीला जन्म दिला. डॉक्टरांनी त्या नवजात मुलीची खोटी कागदपत्र तयार करून घेतली. या सर्व प्रक्रीया रीतसर पूर्ण केल्यानंतर डॉक्टरने त्या नवजात मुलीला सात लाख रुपयांच्या मोबदल्यात हैदराबादच्या दाम्पत्याला विकलं. दरम्यान नागपूर पोलिसांना या घडलेल्या प्रकाराबद्दल गुप्त पद्धतीने माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करुन घेत नागपूर पोलिसांनी या प्रकरणात आरोपी डॉक्टर आणि दलालाला अटक केली आहे.
संघातून काढून टाकायची धमकी देत खेळाडूवर बलात्कार, कबड्डी प्रशिक्षकाला जन्मठेपेची शिक्षा