मिठाचा खडा टाकण्याचं काम करु नका ! अजित पवारांचा संजय राऊतांना टोला
राज्यात सत्तेवर येऊन एक वर्ष होऊन गेलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शाब्दीक युद्धाला सुरुवात झाली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल आरोप, सचिन वाझेंना झालेली अटक या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं महाविकास आघाडी सरकार बॅकफूटला ढकललं गेलं. त्यातचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना या अग्रलेखात अनिल देशमुखांना अपघाताने […]
ADVERTISEMENT

राज्यात सत्तेवर येऊन एक वर्ष होऊन गेलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शाब्दीक युद्धाला सुरुवात झाली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल आरोप, सचिन वाझेंना झालेली अटक या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं महाविकास आघाडी सरकार बॅकफूटला ढकललं गेलं. त्यातचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना या अग्रलेखात अनिल देशमुखांना अपघाताने गृहमंत्री मिळाल्याचं म्हणत एका नवीन चर्चेला तोंड फोडलं. राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनीही राऊतांच्या या विधानावर प्रतिक्रिया देत सरकार व्यवस्थित काम करत आहे. कोणीही मिठाचा खडा टाकण्याचं काम करु नये असा टोला लगावला आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अधिकार आहे की त्यांच्या पक्षात कोणाला मंत्रीपद द्यायचं. सोनिया गांधींचा अधिकार आहे की काँग्रेसमधला कोण व्यक्ती मंत्री बनेल तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रीपद कोणाला द्यायचं हा निर्णय शरद पवार घेत असतात. तीन पक्षाचं सरकार व्यवस्थित काम करत आहे अशा वेळेस कोणीही मिठाचा खडा टाकण्याचं काम करु नये.” बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बाजू मांडली.
दरम्यान, ‘अनिल देशमुख हे अपघाताने गृहमंत्री झाले आहेत.’ अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. याचबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांना नागपूर विमानतळावर दोनदा प्रश्न विचारण्यात आला. पण दोन्हीही वेळी अनिल देशमुखांनी वेगळ्याच मुद्द्यावर बोलत हा प्रश्न टाळला. त्यांनी राऊतांच्या कोणत्याही टीकेला यावेळी उत्तर दिलं नाही. पण यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी एक महत्त्वाची माहिती देखील दिली.
शरद पवारांची अहमदाबादमध्ये अमित शाह यांच्याशी शनिवारी भेट? जाणून घ्या नेमकं काय घडलं