अनिल देशमुखांच्या 100 कोटी वसुली आरोपाप्रकरणी ईडीकडून तीन ठिकाणी छापेमारी
नागपूर: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शंभर कोटी वसुली प्रकरणात आज (25 मे) अंमलबजावणी संचालनालय ( ईडी) ने तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी घातल्या. सागर भटेवार, समित आयझॅक आणि कादरी नावाच्या व्यक्तींच्या या घरी ईडीच्या वेगवेगळ्या टीमकडून छापेमारी करण्यात आली आहे. ईडीच्या तीन वेगवेगळ्या टीमने एकाच वेळी ही छापेमारी केली असल्याचं समजतं आहे. नागपुरातील तिन्ही ठिकाणी […]
ADVERTISEMENT

नागपूर: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शंभर कोटी वसुली प्रकरणात आज (25 मे) अंमलबजावणी संचालनालय ( ईडी) ने तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी घातल्या. सागर भटेवार, समित आयझॅक आणि कादरी नावाच्या व्यक्तींच्या या घरी ईडीच्या वेगवेगळ्या टीमकडून छापेमारी करण्यात आली आहे.
ईडीच्या तीन वेगवेगळ्या टीमने एकाच वेळी ही छापेमारी केली असल्याचं समजतं आहे. नागपुरातील तिन्ही ठिकाणी ईडीने घातलेल्या धाडीमध्ये ईडीला यांच्या कंपन्यांचा संबध अनिल देशमुख यांच्या परिवारातील असलेल्या कंपन्यांसोबत असल्याचा संशय आहे. त्यामुळेच ही छापेमारी करण्यात आलेली आहे. काही महत्वाच्या पुरावांच्या आधारावर आज ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मला दिली जात आहे – माजी गृहमंत्री अनिल देशमुख
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला होता. Prevention of Money Laundering Act (PMLA) अंतर्गत ईडीने अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल केला असून यानंतर अनिल देशमुखांना चौकशीसाठी ईडीसमोर हजर रहावं लागण्याचे संकेत मिळत आहेत. सीबीआयने देशमुखांविरोधात दाखल केलेल्या FIR चा अभ्यास केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळतंय. काही दिवसांपूर्वी देशमुखांच्या नागपूर येखील घरावर सीबीआयने छापे मारले होते.
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात ईडी कडून गुन्हा दाखल
ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अनिल देशमुख नेमकं काय म्हणाले होते:
‘मला मीडियाच्या माध्यमातून अशी माहिती मिळत आहे की, ईडीकडून आता माझी चौकशी होणार आहे. मी न केलेल्या गुन्हयाची शिक्षा देण्याचे काम राजकीय हेतुपोटी सुरु आहे. मी गृहमंत्री असतांना मधल्या काळात काही महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे केंद्र सरकार नाराज असून शकते आणि त्यामुळे माझी चौकशी सिबीआय व ईडीच्या माध्यमातुन होत आहे.’
पुढे बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, ‘मी जेव्हा गृहमंत्री होतो तेव्हा अनेक योग्य निर्णय मी घेतले. यात प्रामुख्याने, आतापर्यंत सीबीआयला महाराष्ट्रात कोणत्याही प्रकरचा तपास करायचा असेल तर राज्य सराकारच्या परवागीची गरज नव्हती. परंतु ऑक्टोबर २०२० ला गृहविभागाने निर्णय घेतला की, सीबीआयला जर महाराष्ट्रात तपास करायचा असेल तर राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक असेल. महाराष्ट्राने हा निर्णय घेतल्या नंतर देशातील अनेक राज्याने महाराष्ट्र सरकार प्रमाणेच निर्णय घेतला.’ असेही अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं.
अँटेलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद-अनिल देशमुख
‘दादरा नगर हवेलीचे सात वेळा खासदार असलेले मोहन डेलकर यांनी मुंबई येथे येवून आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा योग्य तपास होण्याची मागणी अनेक आमदारांनी अधिवेशानात केली होती. त्यावरुन मी एसआयटी गठीत करुन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तसेच अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करुन योग्य तपास सुरु केला. या सर्व गोष्टीमुळे केंद्र सरकार माझ्यावर नाराज असु शकते. त्यामुळेच सीबीआय आणि ईडीच्या मार्फत माझी चौकशी सुरु आहे. ज्या पध्दतीने मी सीबीआयला चौकशीसाठी सहकार्य केले त्याच पध्दतीने ईडीला सुध्दा सहकार्य करणार.’ असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले होते.