Sachin Vaze वर मुंबईतल्या वोक्हार्ट रूग्णालयात Bypass Surgery

मुस्तफा शेख

अँटेलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातला मुख्य सूत्रधार सचिन वाझेवर मुंबई सेंट्रल येथे असणाऱ्या वोक्हार्ट रूग्णालयात बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. Pulmonary edema चा म्हणजेच फुफ्फुसांशी संबंधित त्रास जाणवू लागल्याने सचिन वाझेवर ही तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. सचिन वाझेला NIA ने अँटेलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक केली आहे. डॉ. कमलेश जैन, डॉ. नीरज […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अँटेलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातला मुख्य सूत्रधार सचिन वाझेवर मुंबई सेंट्रल येथे असणाऱ्या वोक्हार्ट रूग्णालयात बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. Pulmonary edema चा म्हणजेच फुफ्फुसांशी संबंधित त्रास जाणवू लागल्याने सचिन वाझेवर ही तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. सचिन वाझेला NIA ने अँटेलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक केली आहे.

डॉ. कमलेश जैन, डॉ. नीरज बर्नवाल, डॉ. केदार तोरसकर, डॉ. अतुल फातरपेरकर या डॉक्टरांच्या पथकाने मिळून ही शस्त्रक्रिया केली. आता सचिन वाझेची प्रकृती स्थिर आहे. तसंच रूग्णालयाच्या बाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे अॅड. आरती काळेकर यांनी ही माहिती दिली आहे.

निलंबित API सचिन वाझेला NIA च्या अटकेत आहे. तसंच अँटेलिया आणि मनसुख हिरेन प्रकरणात आरोप पत्रही दाखल केलं आहे. ज्यामधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. हिरेनच्या हत्येचा कट सचिन वाझे आणि इतर आरोपींनी कसा रचला याची माहिती या आरोपपत्रात NIA ने दिली आहे. याचसोबत सुरुवातीला स्कॉर्पिओ गाडी प्रकरणाचा तपास करणाऱ्या सचिन वाझेने आपल्या वरिष्ठांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केल्याचं समोर आलंय.

या प्रकरणाता तपास करणाऱ्या ACP अधिकाऱ्याने NIA ला यासंबंधीची माहिती दिली आहे. सचिन वाझेने अँटेलिया आणि हिरेन हत्या प्रकरणाच्या तपासात इतर कोणत्याही सहकाऱ्यांना सहभागी होऊ दिलं नसल्याचंही या अधिकाऱ्याने NIA ला सांगितलं.

Mansukh ने आत्महत्या केली असावी ! Sachin Vaze कडून वरिष्ठांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

२६ ते २८ फेब्रुवारी २०२१ या काळात सचिन वाझे स्कॉर्पिओ गाडी प्रकरणाचा तपास करत होता. यानंतर हे प्रकरण ACP दराच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आलं, १ मार्च रोजी या अधिकाऱ्याने या प्रकरणाच्या तपासाची सूत्र आपल्या हाती घेतली. ६ मार्चपर्यंत या अधिकाऱ्याने या प्रकरणाचा तपास केला, ज्यानंतर राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हिरेनच्या हत्येचा तपास ATS कडे सोपवला होता.

मात्र आता NIA ने जे आरोपपत्र दाखल केलं आहे, त्यामध्येच अँटेलिया प्रकरण म्हणजेच स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सचिन वाझेने मुकेश अंबानींच्या घरासमोर का ठेवली? सचिन वाझेने मनसुख हिरेनच्या हत्येचा कट कसा रचला या सगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. चौकशी दरम्यान सचिन वाझेने आपल्याला बळीचा बकरा बनवलं जात आहे असंही म्हटलं होतं. मात्र या सगळ्या प्रकरणांमध्ये त्याचाच हात असल्याचं NIA च्या आरोपपत्रात समोर आलं आहे. आता त्याला फुफ्फुसाशी संबंधित त्रास जाणवू लागला. त्यामुळे तातडीने त्याच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp