सहावीतील मुलाचं CM शिंदेंना पत्र : साहेब, अनुदानचे पैसे द्या, आई दिवाळीला पोळ्या करेल
हिंगोली : जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील सहावीत शिकणाऱ्या एका मुलाचे पत्र सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अनुदानाचे पैसे दिवाळीपूर्वी मिळावे अशी मागणी सहावीतील प्रताप जगन कावरखे याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. घरची हालाखीची परिस्थिती आणि त्यातून होणारी कुंचबना त्याने या भावनिक पत्रातून मांडली आहे. काय लिहिलं पत्रात प्रताप […]
ADVERTISEMENT

हिंगोली : जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील सहावीत शिकणाऱ्या एका मुलाचे पत्र सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अनुदानाचे पैसे दिवाळीपूर्वी मिळावे अशी मागणी सहावीतील प्रताप जगन कावरखे याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. घरची हालाखीची परिस्थिती आणि त्यातून होणारी कुंचबना त्याने या भावनिक पत्रातून मांडली आहे.
काय लिहिलं पत्रात प्रताप कावरखेच्या पत्रात?
माझे बाबा शेती करतात. आमच्या घरी शेती कमी आहे. मी बाबाला म्हणलो की, मला गुपचूप (पाणीपुरी) खायला पैसे द्या. पण पैसे मागितले की भांडण करतात, म्हणतात ह्या वर्षी सगळी सोयाबीन गेली, शेती विकतो अन तुला 10 रुपये देतो.
आईने दसऱ्याला पुरणाच्या पोळ्या केल्या नाही. आईला विचारलं तर म्हणते, खायला पैसे नाहीत. माझे बाबा दुसऱ्याच्या कामाला जातात. मी आईला म्हणले आपल्याला दिवाळीला पोळ्या कर. तर ती म्हणली की बँकेत अनुदान आले की करू.
आई म्हणे बाबासोबत भांडण केलं तर जवळच्या शेतात शेतकऱ्याला त्याच्या पोरानं पैसे मागतले म्हणून फाशी घेतली.आत्ता मी बाबाले पैसे नाही मागत, साहेब आमचं घर पहा आणि अनुदानचे पैसे द्या. मग आई दिवाळीला पोळ्या करते, तुम्ही पोळ्या खायला या. असे आमंत्रणही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.