वडिलांना कोरोना, तर आईला कर्करोगामुळे गमावलं; कोण आहे Bulli Bai अ‍ॅपची मास्टरमाइंड श्वेता?

Bulli Bai app Shweta Singh: जाणून घ्या कोण आहे बुली बाई अॅपची मास्टरमाइंड श्वेता सिंह.
वडिलांना कोरोना, तर आईला कर्करोगामुळे गमावलं; कोण आहे Bulli Bai अ‍ॅपची मास्टरमाइंड  श्वेता?
father dies of corona mother passed away from cancer know who is the mastermind of bulli bai app shweta singh(प्रातिनिधिक फोटो)

Bulli Bai App Case: 'बुली बाई' अॅप प्रकरणात मुंबई पोलिसांनी 18 वर्षीय श्वेता सिंहला उत्तराखंडमधून अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणात आणखी एक आरोपी विशाल कुमार यालाही अटक करण्यात आली होती. आतापर्यंत पोलिसांनी याप्रकरणी एकूण दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात श्वेता मुख्य आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे. जाणून घेऊया श्वेता सिंहबद्दल सविस्तरपणे..

कोण आहे आरोपी श्वेता सिंग?

ती उत्तराखंडची रहिवासी असून ती या प्रकरणातील सूत्रधार असल्याचे सांगण्यात येत आहे. श्वेताने बुली बाई अॅपवर काही विशिष्ट समुदायातील महिलांचे फोटो अपलोड केले होते. तसेच त्यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी देखील केली होती. धक्कादायक बाब म्हणजे हे सगळं करणाऱ्या श्वेताचे वय अवघे 18 वर्षे आहे. मुंबई पोलिसांनी तिला उत्तराखंडमधील उधमसिंह नगर जिल्ह्यातून अटक केली आहे.

श्वेताचे आई-वडील या दोघांचंही निधन झालं आहे. गेल्या वर्षी तिच्या वडिलांचं कोरोनाने निधन झालं होतं, तर त्याआधी तिची आई कर्करोगाने मृत्यू पावली होती. श्वेताला तिला एक मोठी बहीण आहे जी वाणिज्य शाखेत पदवीधर आहे. तर एक लहान बहीण आणि भाऊ देखील आहे. जे सध्या शाळेत शिकत आहेत. श्वेता स्वतः इंजिनीअरिंगच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत होती.

नेपाळशी काय संबंध?

श्वेता नेपाळमधील एका सोशल मीडिया मित्राच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचं आता समोर आलं आहे. तपास पथकातील सूत्रांनी सांगितले की, बुली बाई अॅप प्रकरणात अडकलेल्या श्वेता सिंगकडून मिळालेल्या माहितीनुसार, जियाउ नावाचा एक नेपाळी नागरिक तिला अॅपवर काय पद्धतीने मजकूर टाकायचा याच्या सूचना देत होता. सध्या पोलीस कथित नेपाळी नागरिक आणि श्वेताशी संबंधित इतरांच्या भूमिकेची चौकशी करत आहेत.

श्वेताला आज मुंबईत आणण्यात येणार असून तिला वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात रिमांडसाठी हजर केले जाणार आहे.

श्वेताचे नाव विशाल कुमार याने उघड केले होते. याआधी बंगळुरू येथून त्याला अटक करण्यात आली होती. जो इंजिनीअरिंगच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे.

विशाल-श्वेता होते एकमेकांच्या संपर्कात

विशालने सांगितले की, तो श्वेताच्या संपर्कात होता आणि श्वेता बुली बाई अॅपशी संबंधित सर्व उपक्रमांवर काम करणाऱ्या लोकांच्या संपर्कात होती. जिला नेपाळमधील एका व्यक्तीकडून काही सूचना येत होत्या.

त्याच वेळी, मुंबई पोलीस अधिकारी Sulli Deals च्या घटनांमध्ये देखील विशालची काय भूमिका होती याचा तपास करत आहे. जे 2021 साली उजेडात आलं होतं. विशालवर आरोप आहे की, तो एका विशिष्ट समुदायातील महिलांचे फोटो एडिट करून अॅपवर अपलोड करायचा.

बनावट ट्विटर हँडलचा वापर

श्वेता सिंग JattKhalsa07 नावाचे बनावट ट्विटर हँडल वापरत होती. या हँडलवरून घृणास्पद पोस्ट आणि आक्षेपार्ह फोटो टाकले जात होते. बुली बाई अॅपने ट्विटर आणि फेसबुकवरील 100 महिलांना लक्ष्य केले होते.

या अॅपमध्ये काय आहे?

Bulli Bai नावाच्या अॅपवर मुस्लिम महिलांना टार्गेट केले जात होते. अॅपवर त्यांच्याविरोधात घृणास्पद आणि घाणेरड्या गोष्टी लिहिल्या जात होत्या. वास्तविक, सुल्ली डील अॅपच्या धर्तीवरच बुली बाई अॅपवर काम केलं जात होतं. Sulli deal हे Github लाँच झालं होतं. तर बुली बाई देखील Github वरच लाँच झालेलं.

पीडित महिलांचं काय म्हणणं?

Bulli Bai Appच्या पीडितांपैकी एका महिलेने ट्विट केलं होतं की, 'मी अद्याप येथे माझा फोटो पाहिला नाही. पण या यादीत माझेही नाव आहे. हे सर्व आपल्याला सहन करावे लागत आहे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. मी ही यादी शेअर करत नाही कारण अशा अनेक महिला आहेत ज्यांना ती सार्वजनिक करायला आवडणार नाही.'

आणखी एका महिलेने लिहिले की, 'मी कायदेशीररित्या याचा पाठपुरावा करत आहे. मुस्लिम महिलांना वारंवार टार्गेट करणे, आमचा अपमान करणे हे अत्यंत लज्जास्पद आणि भयंकर आहे. अशा गुन्हेगारी वर्तनाला माफ करता येणार नाही.'

father dies of corona mother passed away from cancer know who is the mastermind of bulli bai app shweta singh
Bulli Bai App case: मुस्लिम महिलांच्या अपमानाचं नेपाळ कनेक्शन, या सीक्रेट 'फ्रेंड'च्या संपर्कात होती श्वेता

नेत्यांनीही दिली प्रतिक्रिया

या प्रकरणी शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे की, 'सुल्ली डीलनंतर त्यांनी बुली अॅपबाबत माहिती आणि प्रसारण मंत्र्यांना 30 जुलै आणि 6 सप्टेंबर रोजी पत्रे लिहिली होती, ज्याचे उत्तर त्यांना 2 नोव्हेंबरला मिळाले होते.'

काँग्रेस नेते शशी थरूर म्हणाले की, 'एखाद्याला ऑनलाइन 'विकणे' हा सायबर गुन्हा आहे आणि मी पोलिसांना त्वरित कारवाई करण्याचे आवाहन करतो. गुन्हेगार शिक्षेस पात्र आहेत.'

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in