पटेलांची पार्टी आठवली, सचिन वाझेंची पार्टी कोणती आहे? - Mumbai Tak - fight between devendra fadanvis and anil deshmukh in house over mansukh hiren death case - MumbaiTAK
बातम्या

पटेलांची पार्टी आठवली, सचिन वाझेंची पार्टी कोणती आहे?

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस दलातले अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात उत्तर दिलं. सभागृहासमोर आपलं निवेदन वाचून दाखवत असताना अनिल देशमुख यांनी खासदार मोहन डेलकर आत्महत्येचा दाखला देऊन विरोधी पक्षांना टोला लगावला. प्रशासक म्हणून काम करणारे प्रफुल पटेल हे भाजप सरकारमधले मंत्री होते […]

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस दलातले अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात उत्तर दिलं. सभागृहासमोर आपलं निवेदन वाचून दाखवत असताना अनिल देशमुख यांनी खासदार मोहन डेलकर आत्महत्येचा दाखला देऊन विरोधी पक्षांना टोला लगावला. प्रशासक म्हणून काम करणारे प्रफुल पटेल हे भाजप सरकारमधले मंत्री होते आणि त्यांच्याकडून डेलकर यांना त्रास होत होता असं वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुखांनी केली. ज्याला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी…सचिन वाझेंची पार्टी कोणती आहे असा विचारत सरकार वाझे यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला.

मनसुख हिरेन मृत्यू: सचिन वाझेंना तात्काळ अटक करा – देवेंद्र फडणवीस

“प्रफुल पटेल जे प्रशासक आहेत त्याची पार्टी तुम्हाला आठवली, मग सचिन वाझेंची पार्टी कोणती आहे?? २००८ साली त्यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला होता? धनंजय गावडेची पार्टी कोणती आहे, कोणत्या पक्षाचे ते उपाध्यक्ष आहेत…सचिन वाझे आजही Crime Intelligence Unit मध्ये काम करतायत आणि त्यांची चौकशी होऊ शकते. सरकारने सचिन वाझेंना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे. सरकार सचिन वाझेंना पुरावे नष्ट करण्याची मुभा देतंय. तुमचा खरा चेहरा आज दिसतोय. इतके पुरावे समोर असतानाही त्यांनी केवळ एका पक्षात प्रवेश केल्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय”, असं म्हणत फडणवीसांनी अनिल देशमुखांना प्रत्युत्तर दिलं.

“अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ चार महिने सचिन वाझेंकडे”

मुंबईत झालेली मोहन डेलकर आत्महत्या आणि नागपुरात छत्तीसगडच्या आयएएस अधिकाऱ्याने केलेल्या आत्महत्येचा दाखला देत बाहेरील लोकांना राज्यातील पोलीस यंत्रणेवर विश्वास असल्याचंही अनिल देशमुख यांनी सांगितलं. एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहे आणि यात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन देशमुखांनी दिलं. यावर बोलत असताना फडणवीसांनी महाराष्ट्राची अशी ओळख आपल्याला तयार करायची आहे का?? बाहेरील लोकांनी येऊन इथे आत्महत्या कराव्यात असं म्हणत सरकारला उत्तर दिलं. त्यामुळे आगामी काळात मनसुख हिरेन प्रकरणात राज्यात किती गदारोळ होतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17 + 11 =

Vicky Kaushal वर सचिन तेंडुलकर इम्प्रेस; कारण… Alcohol चा रिकाम्या पोटी कसा होतो परिणाम? ‘या’ 5 गोष्टी खाऊन चुटकीसरशी घटवा Belly Fat! दिया मिर्झा ‘या’ एका गोष्टीने करते दिवसाची सुरूवात, जाणून घ्या Fitness रूटीन! Weight Gain करायचंय? फक्त ‘ही’ एक गोष्ट खा, सप्लीमेंटची पडणार नाही गरज! ‘सुशांत सिंह राजपूत ओव्हर सेंसिटिव्ह…’, मुकेश छाबरांनी असं काय सांगितलं? ‘दुआओ मे याद रखना’, स्टार कोरिओग्राफर अडकला लग्नबंधनात! PHOTOS Kiara Advani च्या हॉट-टोन्ड फिगरचं खास सीक्रेट, कशी राहते एवढी Fit? Shehnaaz ने शेतात केली मस्ती; Viral फोटो पाहून चाहतेही झाले खुश! Wine पाण्यासोबत का घेत नाहीत? Almond : गरजेपेक्षा जास्त बदाम खाताय! ‘हे’ दुष्परिणाम माहिती आहेत का? तुम्हाला तर ‘या’ सवयी नाहीत ना? असतील तर वाढेल तुमचं Belly Fat! Virat Kohli : ग्लॅमरस फुटबॉलर विराट कोहलीवर फिदा, कोण आहे ‘ती’? मलायकानंतर गर्लफ्रेंडने साथ सोडली, अरबाजच्या ब्रेकअपची चर्चा ‘या’ गोष्टी नियमित फॉलो केल्यात तर Weight Loss ची 100% गॅरंटी! अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग