महाराष्ट्रातील भाजपच्या माजी आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे (BJP) माजी आमदार पास्कल धनारे (BJP Ex MLA Paskal Dhanare) यांचं आज (12 एप्रिल) पहाटेच्या सुमारास मुंबईतील एका रुग्णालयात निधन झालं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याशिवाय त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन त्यांना श्रद्धांजली देखील अर्पण केली आहे. 49 वर्षीय धनारे हे गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर […]
ADVERTISEMENT

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे (BJP) माजी आमदार पास्कल धनारे (BJP Ex MLA Paskal Dhanare) यांचं आज (12 एप्रिल) पहाटेच्या सुमारास मुंबईतील एका रुग्णालयात निधन झालं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याशिवाय त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन त्यांना श्रद्धांजली देखील अर्पण केली आहे.
49 वर्षीय धनारे हे गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर उपचार घेत होते. त्यांना सुरवातीला गुजरातमधील वापी येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण काल (रविवारी) त्यांची प्रकृती अधिक बिघडली त्यामुळे त्यांना तात्काळ मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. पास्कल धनारे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
मुंबईतील PSI चा कोरोनाने घेतला बळी, दुसरी लाट ठरतेय अधिक प्राणघातक
पास्कल धनारे याची राजकीय कारकीर्द नेमकी कशी होती?
पास्कल धनारे हे डहाणूमधील भाजपचे कट्टर कार्यकर्ते मानले जायचे. 2014 विधानसभा निवडणुकीत त्यांनी सीपीएम आणि काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या डहाणू मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकवला होता. यावेळी डहाणूत पहिल्यांदाच भाजपला विजय मिळाला होता. त्यांनी आपल्या आमदारकीच्या काळात डहाणूत भाजपचा बराच प्रसार केला होता. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सीपएमच्या विनोद निकोले यांनी त्यांचा जवळजवळ 4000 हजार मतांनी पराभव केला होता.
अजित पवारांच्या बारामतीत भीषण परिस्थिती, कोरोना रुग्णांवर हॉस्पिटलच्या व्हरांड्यात उपचार
काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचंही कोरोनाने निधन
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनाने निधन झालं होतं. ते 55 वर्षांचे होते.
कोरोनाचं निदान झाल्यानंतर अंतापूरकर यांच्यावर मुंबईतल्या एका रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली होती.
महाराष्ट्रात Corona चा कहर, गेल्या 24 तासात 63 हजारांहून नवे पॉझिटिव्ह रूग्ण सापडले
महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्येचा कहर थांबण्याचं नाव घेत नाहीये. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 63 हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर राज्यात 34 हजार 8 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात एकूण 27 लाख 82 हजार 161 रूग्ण बरे झाले आहेत.
राज्यात 349 कोरोना रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.7 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 31 लाख 75 हजार 585 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 25 हजार 694 व्यक्ती संस्थात्मक व्यक्ती क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 5 लाख 65 हजार 587 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.