कल्याण: वासनांध प्रियकर-प्रेयसी, अल्पवयीन भाऊ-बहिणीवर प्रियकर-प्रेयसीकडून वारंवार बलात्कार

Kalyan crime: कल्याणमध्ये एक अतिशय विचित्र घटना घडली आहे. प्रियकर आणि प्रेयसी यांचा विकृत लैंगिक प्रकार समोर आला आहे.
frequent rape of minor brother and sister by boyfriend and girlfriend kalyan crime
frequent rape of minor brother and sister by boyfriend and girlfriend kalyan crime (प्रातिनिधिक फोटो)

मिथिलेश गुप्ता, कल्याण

ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये एक अत्यंत धक्कादायक लैंगिक विकृत प्रकार उघडकीस आला आहे . एका तरुणीने 14 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केला असून याच तरुणीच्या प्रियकराने या पीडित अल्पवयीन मुलाच्या 16 वर्षीय अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उजेडात आली आहे.

याप्रकरणी विकृत तरुण-तरुणी विरोधात कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

नेमकी घटना काय?

कल्याणमध्ये लैगिंक विकृतीची एक विचित्र घटना समोर आली आहे. कल्याण पूर्व परिसरात हा प्रकार घडला आहे. एका अल्पवयीन भाऊ बहिणीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना ऐकून पोलीससुद्धा अवाक् झाले.

पीडित 14 वर्षीय अल्पवयीन मुलावर एक 23 वर्षीय तरुणी सातत्याने लैगिंक अत्याचार करीत होती. ही तरुणी पीडित मुलाची नातेवाईकच आहे.

दरम्यान, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करुन आरोपी तरुणी थांबली नाही तर तिने तिच्या प्रियकराला पीडित मुलाच्या अल्पवयीन बहिणीसोबत लैगिंक अत्याचार करण्यास भाग पाडले.

गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. तसंच या दोघांची विकृती ही सातत्याने वाढत चालली होती. अखेर दोन्ही अल्पवयीन पीडित भावा बहिणीने नातेवाईकांच्या मदतीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार आता पोलिसांनी आरोपी प्रेयसी-प्रियकरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अद्याप तरी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून लवकरच त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

frequent rape of minor brother and sister by boyfriend and girlfriend kalyan crime
मुंबईतील तरुणी WhatsApp Video कॉलवर व्हायची निर्वस्त्र, अनेक तरुणांना 'असं' करायची ब्लॅकमेल

मात्र, या संपूर्ण प्रकरणामुळे पीडित अल्पवयीन भाऊ-बहिणीवर प्रचंड आघात झाला आहे. हे दोघेही अद्याप या धक्क्यातून सावरु शकलेले नाही. दुसरीकडे या प्रकारमुळे पीडित आणि आरोपी अशा दोन्ही कुटुंबीयांना देखील धक्का बसला आहे.

कारण पीडित आणि आरोपी तरुणी हे एकमेकांचे जवळचे नातवाईक आहेत. त्यामुळेच नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने सगळ्यांनाच हादरा बसला आहे. म्हणूनच अल्पवयीन भाऊ-बहिणीवर अत्याचार करणाऱ्या प्रेयसी आणि प्रियकराला कठोर शासन करण्यात यावं अशी मागणी आता केली जात आहे.

दिवसेंदिवस तरुणांमध्ये वाढणारी लैंगिक विकृती हा आता चिंतेचा विषय ठरत आहे. अशावेळी आता तरुणांना योग्य मार्गदर्शन हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळेच याबाबत प्रशासनाने काही ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in