परदेशातील ‘या’ सेलिब्रेटींनी दिला होता शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
वर्षभर चाललेल्या आंदोलनानंतर कृषी कायदे मागे घेण्यात आले आहेत. परदेशातल्या सेलिब्रिटींनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता रिहाना या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायिकेने भारतातल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता तिने शेतकऱ्यांसाठी ट्विट करत आपण यावर चर्चा केली पाहिजे असं म्हटलं होतं. पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गनेही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तिचं टूलकिट हा वादाचा विषय ठरला होता […]
ADVERTISEMENT

वर्षभर चाललेल्या आंदोलनानंतर कृषी कायदे मागे घेण्यात आले आहेत. परदेशातल्या सेलिब्रिटींनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता
रिहाना या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायिकेने भारतातल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता तिने शेतकऱ्यांसाठी ट्विट करत आपण यावर चर्चा केली पाहिजे असं म्हटलं होतं.
पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गनेही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तिचं टूलकिट हा वादाचा विषय ठरला होता
पॉर्न स्टार मिया खलिफानेही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता आणि दिल्लीतली इंटरनेट सेवा का बंद केली त्यावर प्रश्न उपस्थित केला होता
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लेखिका मीना हॅरीस यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता
अमेरिकेचा फुटबॉलपटू JuJu Smith Schuste नेही भारतातल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्याने या आंदोलनात जखमी झालेल्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतही केली होती.
युट्यूबर आणि रॅपर तसंच कॉमेडियन लिली सिंगनेही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता
शेतकऱ्यांनी वर्षभरापासून कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन पुकारलं होतं. या आंदोलनाला आता यश आलं आहे कारण आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.