राज्यात कोळशाच्या अपुऱ्या साठ्यामुळे होत असलेल्या लोडशेडींगचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. ग्रामीण भागात आजही अनेक ठिकाणी भारनियमन सुरु झालं असून कृषी पंपांनाच्या वीज कनेक्शनवरही याचा परिणाम होतो आहे. राज्यातील या परिस्थितीवरुन भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी सरकारवर निशाणा साधत, मातोश्रीची लाईट बंद केल्याशिवाय यांना करंट बसणार नाही असं वक्तव्य केलं आहे.
परभणीत भाजप किसान मोर्चाच्या वतीने आज कृषी पंपांच्या वीज कनेक्शन तोडणीबद्दल जवाब दो मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात बोलत असताना बोर्डीकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
“शिवसेनेचं हिंदुत्वच ओरिजनल, बाकी सगळे….”
मुख्यमंत्री मंत्रालयात आले तेव्हा त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी दररोज मंत्रालयातील विविध विभागांचा आढावा घेऊन माझ्या राज्यातील जनता कशामुळे त्रस्त आहे याचा आढावा घ्यायला हवा. परंतू मुख्यमंत्र्यांना वेळ आहे कुठे? मातोश्रीची वीज ठरवून 24 तास बंद करुया, तेव्हा विना लाईट काय हाल होतात हे त्यांना कळेल. मातोश्रीची लाईट बंद केल्याशिवाय यांना करंट बसणार नाही, असं आंदोलन करावं लागेल.
12 MLAs : राज्यपालांच्या नावाने काढलेल्या बोगस पत्रातील ‘त्या’ सहा व्यक्ती कोण आहेत?
भाजपा किसान मोर्चाच्या वतीने शेतीचे भारनियमन बंद करावे या मागणीसाठी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांशी बोलताना मेघना बोर्डीकर म्हणाल्या, “दुपारच्या दीड दोन वाजता लाईट चालू आहेत. महाराष्ट्रामध्ये जाणत्या नेत्याच्या सुपीक डोक्यातून तयार झालेल्या महाभकास आघाडीचं सरकार आहे. परभणी जिल्ह्याचे नशीब खूपच दुर्दैवी आहे.” पालकमंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहीम यांच्या हस्तकांशी असलेले संबंधांवर बोलत असताना बोर्डीकरांनी, शरद पवार यांनी मलिकांचा राजीनामा न घेण्याचा अट्टाहास केल्याचं म्हटलंय.