महाराष्ट्रात ओमिक्रॉन या व्हायरस व्हेरिएंटचा कहर पाहण्यास मिळतो आहे. आज दिवसभरात राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटची बाधा झालेले 85 नवे रूग्ण आढळले आहेत. या 85 रूग्णांपैकी 34 रूग्ण हे एकट्या मुंबईत आहेत. एवढंच नाही तर या रूग्णसंख्येमुळे महाराष्ट्रतली ओमिक्रॉन रूग्णांची संख्या आता 252 झाली असून त्यापैकी 137 रूग्ण मुंबईत आहेत. मुंबईच्या दृष्टीने आणि राज्याच्या दृष्टीने ही नक्कीच चिंतेची बाब आहे. मुंबईत आजच कोरोनोचा 2510 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
Covid 19 : ’31 डिसेंबरला पार्टी केलीत, निर्बंध मोडलेत तर खबरदार…’ आदित्य ठाकरेंनी दिला इशारा
आज राज्यात 85 ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. या पैकी 47 रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने ( एन. आय. व्ही.) तर 38 भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने ( आयसर) रिपोर्ट केले आहेत. एन आय व्ही ने रिपोर्ट केले 47 रुग्णांमध्ये 43 आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि 4 निकटसहवासित आहेत.
दिवसभरात आढळलेले 85 रूग्ण कुठे कुठे आहेत?
मुंबई- 34
नागपूर आणि पिंपरी चिंचवड-प्रत्येकी 3
नवी मुंबई आणि पुणे महापालिका-प्रत्येकी 2
पनवेल, कोल्हापूर आणि बुलढाणा -प्रत्येकी 1 रूग्ण
आयसर संस्थेने रिपोर्ट केलेले 38 रुग्ण समुदाय सर्वेक्षणातून आढळले असून प्राथमिक माहितीवरुन त्यांचा कोणाचाही आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास नाही. रुग्णांचा जिल्हानिहाय तपशील खालीलप्रमाणे –
मुंबई -19
कल्याण डोंबिवली -5
नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवड – प्रत्येकी 3
वसई विरार आणि पुणे मनपा – प्रत्येकी 2
पुणे ग्रा. , भिवंडी निजामपूर , पनवेल, ठाणे मनपा – प्रत्येकी 1
लस घेतलेल्यांचंही ‘ओमिक्रॉन’ने वाढवलं टेन्शन! केंद्राच्या माहितीनंतर तज्ज्ञांचा इशारा
महाराष्ट्रातील 252 रूग्णांचा तपशील
मुंबई-137
पिंपरी चिंचवड-25
पुणे ग्रामीण-18
पुणे मनपा -11
ठाणे मनपा-8
नवी मुंबई, पनवेल, कल्याण डोंबिवली, प्रत्येकी -7
नागपूर-6
सातारा, उस्मानाबाद प्रत्येकी-5
वसई विरार-3
औरंगाबाद, नांदेड, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा प्रत्येकी-2
लातूर, अहमदनगर, अकोला, मीरा भाईंदर, कोल्हापूर प्रत्येकी-1
ओमिक्रॉनने बाधित झालेल्या एकूण रूग्णांची संख्या-252
यातील 26 रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी 1 रुग्ण जळगाव, ठाणे, नवी मुंबई आणि औरंगाबाद येथील आहे.4 रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर 9 रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. यापैकी 99 रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.