मुंबई तक: थंडीचा आनंद घेणाऱ्या मुंबईकरांना अचानक वाढलेल्या तापमानाचा त्रास सहन करावा लागला. या थंडीच्या वातवरणात बुधवारी अचानक मुंबईचे तापमान 36.3 अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील गेल्या काही दिवसातील जास्त तापमान असलेला दिवस होता.
सहा दिवसांपूर्वीच मुंबईत वर्षातलं सर्वात कमी तापमान अनुभवलं. 15 अंश सेल्सिअस तापमान अनुभवणाऱ्या मुंबईकरांना बुधवारी अचानक कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागला. बुधवारी मुंबईने 36.3 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
राज्यातील सर्वाधिक तापमान आज मुंबईत नोंदविण्यात आल्याची माहिती हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. हवमाना खात्याचे पश्चिम विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवस आणि रात्रीचं तापमान कमी होताना दिसेल.
याव्यतिरिक्त रत्नागिरी, अलिबाग या भागांमध्ये 35 अंश सेल्सिअस तर पणजीमध्ये 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त बीड, नांदेड, बेलापूर, जळगाव, परभणी, हर्णे, या भागांमध्ये तापमानाचा पारा 30 अंशाचा वर होता.
मागच्याच आठवड्यात (27 जानेवारी) बुधवारीच या थंडीच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली होती.