ग्राहकांनो! तुमचं टेन्शन काही कमी होईना..सोन्याची चमक पुन्हा वाढली! आजचे भाव वाचून थक्कच व्हाल
Today Gold Rate : देशभरात सोन्या-चांदीच्या भावात या आठवड्यात तेजी आल्याचं पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याचे भाव 880 रुपयांनी वाढले आहेत. तर 22 कॅरेट सोनं 800 रुपयांनी महागलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?
22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?
मुंबईत 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Today Gold Rate : देशभरात सोन्या-चांदीच्या भावात या आठवड्यात तेजी आल्याचं पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याचे भाव 880 रुपयांनी वाढले आहेत. तर 22 कॅरेट सोनं 800 रुपयांनी महागलं आहे. राजधानी दिल्लीत आता 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99860 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91550 रुपये झाले आहेत.
आयसीआयसीआय ग्लोबल मार्केट्सच्या रिपोर्ट्सनुसार, जुलै ते डिसेंबर दरम्यान सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
वर्षाच्या अखेरीस हे दर 1 लाखांच्या पार जाऊ शकतं. रविवारी 13 जुलैला देशातील अनेक शहरांमध्ये सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99 हजारांच्या पार गेले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91 हजार रुपयांच्या आसपास आहेत. चांदीच्या भावातही 5000 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आज चांदीच्या प्रति किलोग्रॅमची किंमत 115000 रुपयांवर पोहोचली आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 99710 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91400 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 99710 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91400 रुपये झाले आहेत.










