Kokan Flood : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा

मुंबई तक

कोकणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसंच पावसाचाही हाहाकार पाहण्यास मिळतो आहे. चिपळूण, रायगड, महाड या ठिकाणची स्थिती चिंताजनक आहे. रायगड जिल्ह्यातलं तळये गाव हे तर भूस्खलन झाल्याने वाहून गेलं आहे. या ठिकाणी अद्यापपर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. निसर्गाचा कहर अशा प्रकारे बघायला मिळतो आहे. अशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोकणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसंच पावसाचाही हाहाकार पाहण्यास मिळतो आहे. चिपळूण, रायगड, महाड या ठिकाणची स्थिती चिंताजनक आहे. रायगड जिल्ह्यातलं तळये गाव हे तर भूस्खलन झाल्याने वाहून गेलं आहे. या ठिकाणी अद्यापपर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. निसर्गाचा कहर अशा प्रकारे बघायला मिळतो आहे. अशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.

काय म्हटलं आहे अमित शाह यांनी?

महाराष्ट्रातील रायगडमध्ये पावसाचा कहर आणि भूस्खलन यामुळे झालेली दुर्घटना ही अत्यंत दुःखद आहे. यासंबंधी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. तसंच DG NDRF लाही संपर्क साधला. NDRF ची पथकं मदत आणि बचाकार्य करत आहेत. केंद्र सरकार या ठिकाणी संकटात सापडलेल्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे.

अमित शाह यांनी त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट करत हा संदेश लिहिला आहे. गुरूवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली. यावेळीही त्यांनी महाराष्ट्रातल्या पावसाची स्थिती आणि कुठे काय नुकसान झालं आहे त्याची माहिती घेतली. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही दिलं. आत आज केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता आणि महाराष्ट्रात पुरात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी आम्ही सहकार्य करू तसंच आम्ही महाराष्ट्रासोबत आहोत असं सांगत दिलासा दिला.

महाडमधील बिरवाडीपासून 14 किमीपासून तळई गावाजवळ गुरुवारी संध्याकाळी 5 ते 6 वाजेच्या सुमारास अचानक दरड कोसळून तब्बल 30 हून अधिक घरं ही ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याचं समजतं आहे. दरम्यान, अद्यापपर्यंत यात काही जीवितहानी झाली आहे की नाही याची माहिती मिळू शकलेली नव्हती. आता मात्र या ठिकाणी बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

दुसरीकडे महाड आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत असल्याने बिरवाडी आणि दुर्घटनाग्रस्त भागाशी संपूर्णपणे संपर्क तुटला आहे. ही दुर्घटना होऊन आता अनेक तास उलटले आहेत. मात्र, मुसळधार पावसामुळे अद्यापही दुर्घटनास्थळी बचाव कार्य करणाऱ्या टीम पोहचू शकलेल्या नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार NDRF च्या काही तुकड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp