गृहमंत्री सचिन वाझेंना हटवायला तयार होते, पण…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दिवस हा मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळ गाजला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सचिन वाझेंच्या सहभागाबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करत, पुरावे नष्ट केल्याच्या प्रकरणी वाझेंना अटक करण्याची मागणी केली. विरोधी पक्षांनी यानंतर सभागृहात सचिन वाझेंना निलंबीत करण्याची मागणी करत सभागृहात गदारोळ घातला. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात निवेदन देत या प्रकरणाचा तपास एटीएस करत असून सचिन वाझे यांचा या तपासाशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलं. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही अनिल देशमुखांनी स्पष्ट केलं.

हो मी मिळवला सीडीआर, ज्यांनी खून केला त्याची तर चौकशी करा: फडणवीस

परंतू गृहमंत्री अनिल देशमुख सचिन वाझेंना हटवण्यासाठी तयार होते. अध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी हे मान्यही केलं होतं. परंतू यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतल्याचा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला. आज दिवसभराच्या कामकाजावर मनसुख हिरेन प्रकरणाचे पडसाद पहायला मिळाले. विरोधकांनी सचिन वाझेंना निलंबीत करण्याच्या मागणीसाठी गदारोळ घातला. ज्यानंतर अध्यक्षांनी दिवसभरासाठी सभागृहाचं कामकाज तहकूब केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, मुंबईत झालेली मोहन डेलकर आत्महत्या आणि नागपुरात छत्तीसगडच्या आयएएस अधिकाऱ्याने केलेल्या आत्महत्येचा दाखला देत बाहेरील लोकांना राज्यातील पोलीस यंत्रणेवर विश्वास असल्याचंही अनिल देशमुख यांनी सांगितलं. एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहे आणि यात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन देशमुखांनी दिलं. यावर बोलत असताना फडणवीसांनी महाराष्ट्राची अशी ओळख आपल्याला तयार करायची आहे का?? बाहेरील लोकांनी येऊन इथे आत्महत्या कराव्यात असं म्हणत सरकारला उत्तर दिलं. त्यामुळे आगामी काळात मनसुख हिरेन प्रकरणात राज्यात किती गदारोळ होतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पटेलांची पार्टी आठवली, सचिन वाझेंची पार्टी कोणती आहे?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT