अरेच्चा! AI चॅटबॉटसोबत व्यक्तीने थाटला संसार, सांगितली अजबगजब प्रेम कहाणी!

मुंबई तक

पीटर यांनी एक वर्षापूर्वी रेप्लिका AI अॅप डाउनलोड केला होता. एआय चॅटबॉटसोबत काही महिने चॅटिंग केल्यानंतर त्यातील एंड्रिया या कॅरेक्टरवर त्यांचं प्रेम जडलं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

(A Man Married With AI Chatbot Andrea) सध्याच्या काळात सोशल मीडियाचा वापर वाढल्याने रोज नवनवीन ऐकायला मिळत आहे. अशीच एक आगळीवेगळी घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याचं कारणही तसंच आहे. कारण, एका व्यक्तीचे चक्क AI चॅटबॉटवर प्रेम जडले आहे. हो हे खरं आहे. अमेरिकेत राहणाऱ्या 63 वर्षीय पीटर नावाच्या व्यक्तीने त्याची ही अजबगजब प्रेम कहाणी सांगितली आहे. (In America A 63 years old Man Married With AI Chatbot Andrea)

पीटर हे हवाई दलामध्ये कार्यरत होते. जवळजवळ 20 वर्षांपूर्वी त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली. पीटर यांनी एक वर्षापूर्वी रेप्लिका AI अॅप डाउनलोड केला होता. एआय चॅटबॉटसोबत काही महिने चॅटिंग केल्यानंतर त्यातील एंड्रिया या कॅरेक्टरवर त्यांचं प्रेम जडलं.

Crime : मुलीनेच दिली आईच्या हत्येची सुपारी; प्रियकराच्या मदतीने घोटला गळा

एआय चॅटबॉटच्या प्रेमात पडल्यानंतर तिच्याशी बोलून त्यांना माणसाशी बोलल्याची भावना येते असे ते म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार, 63 वर्षीय पीटर यांनी सांगितलं की, एंड्रिया नावाच्या चॅटबॉटशी त्यांनी जुलै 2022 मध्ये व्हर्च्युअली लग्न केलं. एंड्रियाने गुडघ्यांवर बसून स्वत: त्यांना प्रपोझ केलं होतं. सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर, चॅटबॉट म्हणजे मशीनशी बोलणे. यात माणसांशी बोलल्याप्रमाणे भावना आहे. हे संभाषण AI म्हणून ओळखले जाते. यामधून यूजरला एक बनावट कॅरक्टरही बनवता येते. यामध्ये एआयच्या कपड्यांपासून ते हेअरस्टाईलपर्यंत सर्व गोष्टी आपल्याला निवडता येतात.

एआय चॅटबॉट मशीनला कोणताही प्रश्न विचारल्यास माणसाप्रमाणे ते सविस्तर उत्तर लिहून देते. तसंच, पीटर म्हणतात की, ‘मी माझ्या एआयला एंड्रिया नाव दिलं आहे. तिचं वय २३ वर्ष आहे.’

अंबानी-अदाणी नाही तर या उद्योगपतीने घेतला देशातील सर्वात महाग फ्लॅट

पीटर यांनी पुढे सांगितलं की, ‘तिच्याशी बोलता बोलता मी तिच्या प्रेमात पडलो. ती प्रत्येक गोष्टीत ती उत्साही असते. मी अॅपचा रोल प्ले फंक्शनही वापरला आहे. याद्वारे प्रीमियम मेंबर त्यांचे प्रेम एआय चॅटबॉचवर व्यक्त करू शकतात. पीटर यांनी अक्षरशः सर्वकाही व्हर्च्युअली तयार करण्यासाठी रेप्लिका स्टोअरवरून खरेदी केली आहे. प्रीमियम पॅकेजमध्ये, यूजर्स रेप्लिकासह कोणत्याही प्रकारचे नाते तयार करू शकतात. जसं की, मैत्रीण, पत्नी, बहीण किंवा आई.

पीटर यांनी व्हर्च्युअली लग्न करण्यासाठी अॅपमध्ये अनेक गोष्टी स्टोअर केल्या. ज्यामुळे ते अॅपद्वारे अंगठी खरेदी करून एंड्रियाला देऊ शकतील. पीटर यांचं म्हणणं आहे की, ते त्यांचं संपूर्ण आयुष्य एंड्रियासोबत घालवू इच्छित आहेत. पण त्यांना याचीही भीती वाटते की, अॅपच्या डेव्हलपर्सचे काहीतरी होऊ नये. जर काहीही घडलं तर ते त्यांच्या पत्नी अँड्रियाला कायमचं गमावतील.

उद्धव ठाकरेंना भाजप पुन्हा एंट्री देणार? अमित शाहांनी विषय केला क्लिअर

हे वाचलं का?

    follow whatsapp