महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांचं निदान, 64 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात 4 हजार 130 नवीन रूग्णांचे निदान झालं आहे. तर राज्यात 64 कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्याचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका आहे. महाराष्ट्रात 2506 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 62 लाख 88 हजार 851 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात Recovery Rate 97.2 टक्के इतकं झालं आहे. आज राज्यात अनेक दिवसांनी बरे झालेल्या रूग्णांपेक्षा पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या जास्त आहेत.

महाराष्ट्रात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 46 लाख 60 हजार 860 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 82 हजार 117 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 2 हजार 196 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 2013 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 52 हजार 25 सक्रिय रूग्ण आहेत. आज दिवसभरात राज्यात 4130 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या 64 लाख 82 हजार 117 इतकी झाली आहे.

महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि सक्रिय रूग्णांची संख्या

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुंबई -4031

ठाणे- 7171

ADVERTISEMENT

रत्नागिरी-1091

ADVERTISEMENT

पुणे-15469

सातारा-6175

सांगली-3537

कोल्हापूर-1021

सोलापूर-2689

अहमदनगर-5021

सक्रिय रूग्णसंख्येवर नजर टाकली तर लक्षात येतं की सर्वात जास्त सक्रिय रूग्ण पुण्यात आहेत. त्यानंतर ठाणे, सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यात आहेत.

मुंबईत 416 नवे रूग्ण

मुंबईत 416 नवे रूग्ण आढळले आहेत. तर 382 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मुंबईत आत्तापर्यंत 7 लाख 23 हजार 840 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मुंबईचा डबलिंग रेट 1379 दिवस इतका झाला आहे. मुंबईत 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT