चिंता वाढवणारी बातमी, महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा कहर - Mumbai Tak - increasing covid cases in maharashtra raising the concern - MumbaiTAK
बातम्या

चिंता वाढवणारी बातमी, महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा कहर

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. गेल्या ७० दिवसांत पहिल्यांदाच बुधवारी एका दिवसात सर्वाधिक रूग्णसंख्येची नोंद झाली आहे. काल दिवसभरात ४ हजार ७८७ नव्या रुग्णांची भर पडली. रूग्णवाढीचा विचार करता मंगळवारच्या तुलनेत बुधवारी नव्या रूग्णांची संख्या तब्बल १ हजार १२४ ने अधिक नोंदली गेली आहे. मंगळवारी ही संख्या ३ हजार ६६३ इतकी होती. ७० दिवसांपूर्वी […]

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. गेल्या ७० दिवसांत पहिल्यांदाच बुधवारी एका दिवसात सर्वाधिक रूग्णसंख्येची नोंद झाली आहे. काल दिवसभरात ४ हजार ७८७ नव्या रुग्णांची भर पडली. रूग्णवाढीचा विचार करता मंगळवारच्या तुलनेत बुधवारी नव्या रूग्णांची संख्या तब्बल १ हजार १२४ ने अधिक नोंदली गेली आहे. मंगळवारी ही संख्या ३ हजार ६६३ इतकी होती.

७० दिवसांपूर्वी गेल्या ९ डिसेंबरला सर्वाधिक ४,९८१ एवढे कोरोना रूग्ण आढळले होते. त्यानंतर पहिल्यांदाच रूग्णसंख्येत झालेली ही वाढ सगळ्यांना काळजीत टाकणारी आहे.

बुधवारी राज्यात एकूण ४० करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. मंगळवारी ही संख्या ३९ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४९ टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १९ लाख ८५ हजार २६१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५.६२ टक्के इतकं आहे.

ही देखील बातमी वाचा: ‘रुग्ण वाढतायेत, कठोर कारवाई करा’; अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

राज्यातल्या अॅक्टिव्ह रूग्णसंख्येतही मोठी वाढ होताना दिसतेय. ९ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी या काळात राज्यातल्या ३६ पैकी २१ जिल्ह्यांतही रूग्णसंख्या वाढते आहे. यापैकी ७ जिल्ह्यात प्रशासनानं प्रतिबंधात्मक उपाययोजना आणखी कडक करण्यास सुरवात केली आहे.

अमरावती, नागपूर, बुलडाणा, यवतमाळ, अकोला, परभणी आणि जालना जिल्ह्यात ५ हून जास्त लोकांना एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

राज्यात सध्याच्या घडीला एकूण ३८ हजार ०१३ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यात मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ हजार ५३० इतकी असून ठाण्यात ही संख्या ४ हजार ६८१, तर पुण्यात ७ हजार ५०९, औरंगाबादेत ७५१, नागपूरमध्ये ५ हजार ०५ इतकी आहे. राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्णसंख्या पुण्यात आहे. तर सर्वात कमी रुग्णसंख्या गडचिरोलीत आहे. गडचिरोलीत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या केवळ ५७ इतकी आहे.

या बातमीकडेही द्या लक्ष: वाढत्या कोरोना रुग्णांमुळे ‘या’ जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश जारी

राज्यात गेल्या आठ दिवसांत २९ हजार ९३६ कोरोना रूग्ण आढळले आहेत. म्हणजेच दररोज सरासरी ३ हजार ७४२ रूग्ण आढळले. पण याआधीच्या २० दिवसात ही सरासरी ३ हजाराच्या खाली होती.

कोविड चाचण्यांची घटलेली संख्या आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे कानाडोळा केल्यामुळे रूग्णसंख्येत ही वाढ होत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

9 + 19 =

विस्मरणाचा असेल आजार तर एवढंच करा दुधामध्ये फक्त ‘ही’ चार पानं टाका Tadoba: सगळ्यांसमोर भिडले दोन वाघ, रक्तबंबाळ झाले अन्.. दररोज Squats करा; मिळतील ‘हे’ 7 अप्रतिम फायदे! फिरायचा प्लान करताय? मुंबईपासून काही अंतरावर असलेली ‘ही’ ठिकाणं करा Explore रम आणि ब्रँडीमध्ये ‘हा’ आहे फरक… ‘या’ 5 टेक्निक्सने Hip Fat झटपट करा दूर! Team India सोबत विमानात कोण होती ती ‘मिस्ट्री गर्ल’, पाहा PHOTO सनी देओल दिसला दारूच्या नशेत, व्हिडीओ व्हायरल… ‘Animal’ मध्ये रणबीरसोबत रोमान्स, अभिनेत्रीचा ग्लॅमरस-हॉट लुक पाहिला का? Top 10 बेस्ट केटो डाएट फॉलो करून करा Weight Loss Weight Loss: महिन्याभरातच कसं व्हायचं स्लिम-फिट? दररोज नारळ पाणी प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतात? Archies: नातवाचा ग्रँड डेब्यू; धाकट्या भावासोबत पहिल्यांदाच दिसले अमिताभ बच्चन! गाजराचा हलवा बनवताय? मग लक्षात ठेवा ‘या’ छोट्या टिप्स… डॉ. बाबासाहेबांबद्दल 10 खास गोष्टी, तुम्हाला किती माहितीये? तुमचं सौंदर्य चाळीशीतही राहील सुंदर अन् निरागस; फक्त ‘या’ 3 गोष्टी नेहमी करा फॉलो! Rashmika Mandanna टोन आणि फिट फिगरसाठी घेते ‘हे’ सीक्रेट डाएट! Weight Loss 6 Low-Calorie Dinner: रात्री जरा कमी जेवा, कारण… Daman: मुंबईपासून एकदम जवळ, Vacation साठी हटके लोकेशन ते ही अगदी स्वस्तात