Mumbai Tak /बातम्या / Ind Vs Aus : अहमदाबाद कसोटी सामना पंतप्रधान मोदीही बघायला जाणार, कारण…
बातम्या स्पोर्ट्स

Ind Vs Aus : अहमदाबाद कसोटी सामना पंतप्रधान मोदीही बघायला जाणार, कारण…

PM Narendra Modi visit 4th Test Match : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यातील चौथ्या आणि शेवटचा कसोटी सामन्याला येत्या 9 मार्चपासून सूरूवात होणार आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील हा सामना अहमदाबादला खेळवला जाणार आहे. या सामन्याला दोन्ही देशाचे पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आणि ऑस्ट्रेलियाचे एंथनी एल्बनीज (PM Anthony Albanese) हा सामना एकत्र पाहणार आहेत. त्यामुळे स्टेडिअमवर व्हिआयपी मुव्हमेंट पाहायला मिळणार आहे. या कारणामुळे स्टेडिअमचा काही हिस्सा पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या हेतूने प्रेक्षकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. आता पंतप्रधानांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या सामन्याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागली आहे. (ind vs aus 4th test pm modi and austalian pm anthony albanese watch test or border gavaskar trophy)

गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटकी अनिल पटेल यांनी स्पोर्टस तकला दिलेल्या माहितीनुसार, हा सामना दोन देशाचे प्रधानमंत्री पाहायला येणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव काही सीट्स लॉक करण्यात येणार आहेत. त्यामुळे या सीट्स फॅन्ससाठी उपलब्ध नसणार आहेत. ज्यावेळेस सामना पाहण्यासाठी कोणताही प्रमुख पाहुणा येतो, त्यावेळेस असे केले जाते. तसेच तोच भाग राखीव केला जातो, ज्या भागात व्हिआयपी मुव्हमेंट असते. राखीव सोडून इतर सीट्सचे तिकीट फॅन्स खरेदी करू शकणार आहेत. तसेच या सामन्याचे तिकीट ऑनलाईन आणि ऑफलाईनही खरेदी करता येणार आहेत.

Ind Vs Aus: पराभवानंतर टीम इंडियात होणार बदल? ‘हा’ प्लेयर खेळण्याची शक्यता

अहमदाबाद टेस्ट निर्णायक

चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने (Team india) 2-1 ने मालिकेत आघाडी घेतलीय. आता शेवटचा अहमदाबादमध्ये रंगणारा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याच्या तयारीत असणार आहे. त्याबरोबरच सामना जिंकून टीम इंडियाची वर्ल्ड टे्स्ट चॅम्पियनशीपची (WTC) शर्यंतही अवघड करणार आहे. तर टीम इंडिया हा सामना जिंकून कसोटी मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. यासोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची तिकीट कन्फर्म करणार आहे.

कोण मारणार बाजी?

ऑस्ट्रेलियाने (Australia) 2004 पासून भारताविरूद्ध एका सीरीजमध्ये दोन टेस्ट सामने देखील जिंकले नाहीत. अहमदाबादच्या सामन्यात त्यांना ही संधी असणार आहे. कारण ऑस्ट्रेलियाने तिसरा टेस्ट सामना 9 विकेट्सने जिंकला आहे. आता चौथा टेस्ट सामना जिंकून त्यांना ही मोठी संधी असणार आहे. तर टीम इंडियाने 2012 नंतर मायदेशात एकही टेस्ट सीरीज हरली नाही, त्यामुळे ही विजय घौडदौड कायम राखण्याचा त्यांचा इरादा असणार आहे.

Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर टीम इंडियाचा WTC चा प्रवास खडतर, जाणून घ्या समीकरण

पिच रिपोर्ट काय सांगतो?

टीम इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यातील टेस्ट सामन्यात पिचची खुप चर्चा झाली. अनेक पीचवर बॉल खुपच स्पिन होत होता. इंदूर सामन्यात तर पिच इतका वाईट होता की सामना तीन दिवसातच संपुष्ठात आला होता. त्यामुळे अनेक पिचवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. आता चौथा टेस्ट सामन्याचा पिच कसा असणार आहे? याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता असणार आहे. दरम्यान गेल्या तीन सामन्यातील पीच गोलंदाजांना मदतगार होता.मात्र चौथा टेस्ट सामन्याचा पिच बॉलर्स आणि बॅटसमनना या दोघांना मदतगार असणार आहे.

दरम्यान चार टेस्ट सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया (India VS Australia) 2-1 ने आघाडीवर आहे.आता चौथा टेस्ट सामन्यावर कोण बाजी मारतो ? याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष लागले आहे.

रक्षकच बनले भक्षक! पोलिसांचाच गॅगरेप पिडितेवर बलात्कार Uttar Pradesh: महिलेच्या हत्येचे गूढ 9 वर्षांनंतर एका पोपटाने उलगडलं… Shraddha Arya: बॉलिवूड अभिनेत्रीने पतीच्या वाढदिवसाला घातली बिकिनी, नेटकरी म्हणाले… प्रसुतीनंतर अभिनेत्रीचं अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं 10 किलो वजन! Amrita Ahuja: हिंडेनबर्गच्या अहवालात भारतीय वंशीय महिलेचं नाव, गंभीर आरोप 38 कोटींचा बेवारस चेक परत केला अन् जे मिळालं त्याने पायाखालची जमीन सरकली Twitter Blue tick: ब्लू टिकसाठी आता पैसे भरा, महिन्याला किती रुपये द्यावे लागणार? H3N2 Virus पासून बचावासाठी ‘या’ घरगुती गोष्टींचा आहारात करा वापर… MS Dhoni: आयपीएलमध्ये धोनी करणार गोलंदाजी? नेटमधील फोटो बघून चाहते बुचकळ्यात Anushka Sharma : ग्लॅमरस ड्रेस, पायात घुंगरांचं पैजण अनुष्काची यूनिक स्टाईल चाहत्यांना भावली वय अवघं 48…काजोल देवगणच्या बोल्ड लूकची चर्चा ‘भाबी जी घर पर हैं’ हा अश्लील शो आहे का? अंगूरी भाभी म्हणाली, ‘मी कधीही…’ हिंदू राष्ट्राचे स्वप्न महाराष्ट्रातूनच पूर्ण होईल: धीरेंद्र शास्त्री या 6 गोष्टी रोज करा.. आयुष्यभर आनंदाची खात्री Salman Khan: कोट्यवधींमध्ये फीस घेतो, तरीही राहतो 1BHK फ्लॅटमध्ये, घरात काय काय? ईशा अंबानीचा रॉयल लूक पाहतच राहाल… मोबाइल दुकानदारावर जडला जीव; पत्नीने रचला कट, पतीची निर्घृण हत्या! 4 फूट उंचीचा ‘तो’ रेसलर, WWE च्या रिंगमध्ये महिला रेसलरला केलेलं KISS बॉलिवूडच्या ललनाचा हॉट बॅकलेस अवतार गर्लफ्रेंडला परत मिळवण्यासाठी ठोठावला कोर्टाचा दरवाजा